Breaking

(व्यक्तीमत्व विशेष)
भडगाव तालुक्याचे शान तुम्ही सर्वांचा मान ठेवतात फक्त तुम्हीच समाजसेवेचे व्रत घेतले फक्त तुम्हीच सर्वांचा अभिमान करतात तुम्हीच सौ. योजनाताई पाटील
 शब्दांकन- अनिलआबा येवले

0

पाचोरा- निराधारांच्या निःस्वार्थ सेवेकरी : नगरसेविका योजनाताई पाटील
✍ योजनाताई घर संसार सांभाळून सामाजिक कार्यात वेळ देऊन निःश्वार्थ जनसेवा कार्य करीत आहेत. त्यांची अनेक पदावर नियुक्ती असून महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन, संजय गांधी निराधार योजना, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या भडगाव येथील चांगल्या कामगिरीची दखल घेत त्यांची संजय गांधी निराधार योजना या समितीवर निवड केली. रजि. भारत सरकार विधवा महिलांसाठी स्री शक्ति योजना, तसेच मानव संरक्षण समिती भडगाव, या समितीवर नियुक्ती केली.

भडगाव येथील श्री समर्थ संदेश महिला बचत गट अध्यक्षपदी निवड केली. समन्वयिका यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान यावर नियुक्ती, अध्यक्षा राजमाता जिजाऊ तनिष्का व्यासपीठ, सदस्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्य, अशा अनेक पदावर सेवाभावी कार्य करीत असून निराधारांच्या निस्वार्थ सेवेचा संकल्प योजनाताईंनी केला असून त्यांना अनेक पुरस्कार व गौरव सन्मानपत्र गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्र शासन महसूल विभागाने त्यांचा सन्मान केला. महाराष्ट्र शासन श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे एक धाडसी महिला म्हणून राष्ट्रवादी पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांचा सन्मान केला. राज्यस्तरीय महाराष्ट्र नवरत्न पुरस्कार लोणावळा येथे सत्कार करण्यात आला. नवी दिल्ली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. पर्यावरण रत्न पुरस्कार नाशिक, श्री स्वामी विवेकानंद समाज रत्न पुरस्कार पनवेल, सहकार महर्षी मा. आमदार स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ दुर्गाशक्ती पुरस्कार, राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार, इंटरनॅशनल अवार्ड परेल मुंबई, फातिमा बी शेख आदर्श महिला सन्मान-पुरस्कार रावेर, समता जीवन गौरव पुरस्कार अमरावती, राज्यस्तरीय आदर्श रणरागिनी पुरस्कार कोल्हापूर, महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार खोपोली, विश्व नायक प्रेरणा समाज रत्न पुरस्कार बीड, आदर्श कोरोना योद्धा सन्मानपत्र करवीर आयुष्यमान महाराष्ट्र गौरव पुरस्कार मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महिला शक्ती पीठ पुरस्कार जळगाव, असे अनेक पुरस्कार मिळून पाचोरा- भडगाव तालुका आदर्श नगरसेविका पुरस्कार बरोबर इतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील पुरस्काराने गौरव सन्मान मिळालेल्या एकमेव महिला म्हणजेच सौ.योजनाताई पाटील आहेत. योजनाताई या भडगाव नगरपरिषद मध्ये नगरसेविका असून सतत जनसेवेसाठी कार्यतत्पर असतात. खऱ्या अर्थाने योजनाताई निराधारांच्या आधारस्तंभ आहेत. योजनाताई म्हणजे जिल्ह्याची शान ! सर्वांचा ठेवता मान !! हाच त्यांचा एक आदर्श स्वाभिमान !!! आणि म्हणूनच त्यांचा आहे आपणास अभिमान !!!
️ शब्दांकन : (अनिल आबा येवले)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here