Breaking

भडगांव तालुका विधी सेवा समिती मार्फेत न्यायालयात कायदेविषयी शिबीर संपन्न

0

भडगांव – तालुका विधी सेवा समिती मार्फेत न्यायालयात कायदेविषयी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात भडगांव येथील मुख्य न्यायाधिश आर.डी.खराटे मॅडम,सह न्यायाधिश आय.जे.ठाकरे साहेब,अॅड.व्हि.डी.मोतीवाले ,सरकारी वकील, भडगांव वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बी. टी.अहिरे ,अॅड.के. टी.पाटील ,अॅड.मुंकूद बी.पाटील,अॅड.सिध्दार्थ वानखेडे,अॅड.हेमंत कुलकर्णी,अॅड.आर.के.वाणी,अॅड.ए.के.पवार, अॅड.आर.आर.पाटील,अॅड.विनोद महाजन,अॅड.सुनिल आर.सोनवणे.अॅड.राजपुत न्यायालयीन कर्मचारी वर्ग नाझर चौधरी नाना,नितीन पालखे नाना, विनोद पाटील,माळी भाऊसाहेब,पाटील भाऊसाहेब,पैरवी अधिकारी कंडारे दादा,केसवाॅच भाऊराव पाटील,इतर बरीच मिञ व पक्षकार मंडळी,वगैरे हजर होते.या प्रसंगी

अॅड.व्हि.डी.मोतीवाले,सरकारी वकील,यांनी मोटार वाहन अधिनियम च्या तरतुदी,दंड व शिक्षेबाबत तसेच जेष्ठ नागरीकांना खावटीच्या तरतुदी बाबतीत आपले मोलाचे कायदेशीर विचार मांडलेत. तसेच अॅड.कें.टी.पाटील यांनी मोफत कायदा विषयक असलेल्या तरतुदीबाबत सविस्तर विचार मांडलेत ,त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधिश आर.डी.खराटे मॅडम यांनी केसेस मध्ये तडजोड लवकरात लवकर करणेबाबत,आपसातले वाद मिटविण्यासाठी तसेच पुढील महिन्यात येणारे लोकन्यायालयात जास्तीत जास्त केसेस ठेवुन,आपसात प्रकरण मिटविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यामुळे वेळ व पैशाची बचत होते.असे मोलाचे विचार मांडलेत.शेवटी भडगांव वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बी.टी.अहिरे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here