Breaking

राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुका वतीने गुणवंत पाल्य व कोरोना योद्धाचा सन्मान

0

भडगावः- मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस तारक व मारक आहे. त्याचा वापर योग्य पध्दतीने केल्यास त्याचे फायदे निश्चित आपल्याला मिळतील. पालकांनी आपल्या पाल्यावर संस्कार करण्यात कमी पडु नका, विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवुन आपली वाटचाल सुरु ठेवल्यास यश निश्चित मिळेल. असे मार्गदर्शन राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यध्यक्ष भानुदास विसावे यांनी व्यक्त केले.


कार्यध्यक्ष भानुदास विसावे हे भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुका वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित गुणवंत पाल्य व कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राज्य उपाध्यक्ष पाडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, नायब तहशिलदार महेद्र मोतीराय, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील, तालुकाध्यक्ष रवि अहिरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ, सचिव आबा बाविस्कर, युवा अध्यक्ष सुधिर अहिरे, महिला तालुकाध्यक्ष लताताई अहिरे, महिला उपाध्यक्ष सुरेखा वाघ, प्रा. दिनेश तांदळे, पत्रकार अशोक परदेशी, संजय पवार आदि उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शाखावतीने शहरातील १० वी, १२ वी, पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थी व कोरोना काळात मदत करणारे शासकीय कर्मचारी व पत्रकार यांना उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला. यात भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, पो. काॕ. ईश्वर पाटील, पो. काॕ. प्रल्हाद शिंदे, कीरण ब्राम्हणे सह इतर विभागातील कर्मचारी यांचा सहभाग आहे. यावेळी भडगाव महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक प्रा. दिनेश तांदळे यांनी शारीरिक शिक्षण विषयात पीएचडी मिळविली याबद्दल त्याचा उपस्थित मान्यवराच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी १० वी, १२ वी, पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी हुरळुन न जाता. जास्त गुण मिळाले आपण हुशार आहोत असा समज न करता गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या पदावर जावुन कर्तव्याने मोठा सन्मान मिळवा. असे नायब तहशिलदार मोतीराय यांनी सांगितले तर पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत १६ वर्ष हे युवा वर्गाच्या जीवनात धोक्याचे असते, या वयात वाकडे पाऊल पडु न देता वाॕटस्आप, फेसबुक, इस्टाग्राम याला फालो न करता बाबासाहेबचे विचाराना फालो करा जेणे करुन तुमची शैक्षणिक प्रगती होईल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे तर सुत्रसंचलन बाळकृष्ण जडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here