Breaking

दारू व्यवसायासाठी पाचशे रूपयांची लाच घेतांना
पोलीसास रंगेहात पकडले

0

जळगाव – दारू व्यवसायावर कारवाई करू नये यासाठी पाचशे रूपयांची लाच फैजपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अनिल महाजन याने मागीतली. दारू व्यावसायिकाकडून ५०० रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या सापळयात पोलीस नाईक अलगद सापडला असून त्यास अटक करण्यात आली.


फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार याचा किरकोळ दारू विक्री व्यवसाय आहे. या व्यवसाय नियमितपणे सुरू रहावा व कायदेशीर कारवाई करू नये यासाठीच्या मोबदल्यात दरमहा ५०० लाचेची मागणी केली.

तक्रारीनुसार यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारदाराच्या तक्रारीनुसार व फैजपूर पोलीस ठाण्यात लाच देण्याचे ठरल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी कर्मचार्‍यांनी सापळा लावला. यात पोलीस नाईक अनिल भगवान महाजन बक्कल नं.२९६५, फैजपूर पो.स्टे. रा.रावेर, याने दारू विक्रेत्याकडे केलेल्या ५०० रूपये लाचेची मागणीचा पहिल्या हप्ता म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यातच पो.ना. अनिल महाजन याने पंचासमक्ष स्विकारली. म्हणून गुन्हा दाखल असून पो.ना.अनिल महाजन यास अटक करण्यात आली.
पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, अशोक अहिरे, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदी सहकार्‍यांनी सदरची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here