Breaking

ना. जयंतदादा पाटील यांची मा.आ. दिलीपभाऊ वाघ यांनी थेट भेट घेऊन तितुर नदीस आलेल्या पुरामुळे परिसतील शेती व गावातील घरांचे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मीळणेसाठी दिले निवेदन

0

चाळीसगाव- परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे चाळीसगाव शहर व तालुक्यातील तसेच परिसरातील पूरग्रस्त भागातील गावात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंतदादा पाटील साहेब आले असता भडगाव- पाचोरा विधानसभा मतदार संघातील गावात व शेत परिसरात देखील तितुर  नदीस आलेल्या पुरामुळे परिसतील गावातील घरांचे नुकसान व शेतकर्‍यांची जवळपास पाचशे हेक्टरच्या वर जमीन वाहून गेली.

विशेषबाब म्हणजे कजगाव येथील केटी बंधाऱ्या च्या दोघं बाजूस भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी व बंधाऱ्याचे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी करण्यात यावे आणि कजगाव गावास सतत पुरामुळे नदीकाठच्या घरांना व शेतांना सतत नुकसान पोहचते म्हणुन संरक्षण भिंत बांधण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी याबाबत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी ना. जयंतदादा पाटील यांच्याकडे सविस्तर निवेदन देवुन सविस्तर चर्चा केली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ना.जयंतदादा पाटील यांनी संबधित सर्व अधिकार्‍यांना कार्यवाई करणे बाबत अती तातडीच्या सुचना दिल्या यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी पं. सं. सभापती नितीनदादा तावडे,तालुकाध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, गोपी पाटील, रणजीत पाटीलसर, आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here