Breaking

पाचोरा पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार
दुर्लक्षीत पणामुळे ग्राहकांना सोसावा लागतो भुर्दंड

0
374

पाचोरा- भारत सरकारचे काही विभाग आजही असे आहेत की त्यांना इंग्रजकालीन कामकाज & कार्य पद्धतीच्या बाहेर जाता येत नाही यापैकी दळण-वळण च्या साधनांमध्ये पोस्ट विभागाचा मोठ्या प्रमाणात सहभाग गणला जातो. त्यामुळे बऱ्यापैकी खाजगी कोरीअर कंपन्यांनी आपला जम बसवला परीणामतः शासकीय& कायदेशिर कामांसाठी मजबुरीने पोस्ट विभागाचा वापर केला जातो.

वाढते खाजगी करण व सर्व्हीस याचा विचार करून आता- आता ५-७ वर्षात पोस्ट विभागाने इंग्रज कालीन कार्यप्रणालीत बदल करीत संगणीकरण सह इतर बाबीत बदल केले. परंतु आजही पोस्ट विभागाच्या अकार्यक्षम कामकाज पद्धतीचा भार ग्राहकांना सोसावा लागत आहे. याचा प्रत्यय जळगाव जिल्हयातील पाचोरा शहर पोस्ट ऑफीस बाबत असा आला की पाचोरा पोस्ट ऑफीसमध्ये चक्क साधे रजि. करण्याचे कोडस्लीप उपलब्ध नसल्याने ग्राहकांना विनाकारण दुप्पटीचे पैसे मोजुन स्पीडपोस्टने रजि. करावे लागत आहे. तरी यासंदर्भाची दखल वरीष्ठ अधिकार्‍यांनी घेऊन ग्राहकांना सुरळीत करून देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here