Breaking

एस.टी.महामंडळाच्या कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनामुळे
एस टी विभागास लाल डब्ब्याचा फायदा घेता येत नाही

0

पाचोरा- ग्रामीण-शहरी भागात ज्या ठिकाणी रेल्वे नाही अशा प्रवाशांना वाहतुकीचे साधन म्हणुन . एस.टी. प्रथम क्रमांकाने पसंती दिली जाते. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून कोणी लाल परी – तर कोणी लाल डब्बा म्हणुन एसटीची ओळख देतात अर्थात त्याला कारणही तसेच आहे आजच्या स्थितीत निम्या पेक्षाही जास्त एस टी बसेस या विना मेंटनन्स धावतात तर काही खाजगी बसेसच्या स्पर्धेत लाल परीची उपमा देत धावतात या एस टी बसेस लाल परी सोडल्यातर चली तो चॉद तक- नाही तो आधेतक अशी सर्वाधिक परिस्थिती दिसुन येते म्हणजे जी रस्त्यात बंद पडते. कोरोना काळीत बहुतांश रेल्वे बंद असल्यामुळे बहुतांश प्रवासी एस टी च्या प्रवासाला पसंती देत आहे तरी सुध्दा या संधीचे सोने करण्याची आणि चांगली सेवा देण्याची एस.टी. विभाग परिवाराची दिसत नाही

अशी अवस्था म्हणजे एसटी महामंडळाचे चालक, वाहक अत्यंत कृतीशिल व मेहनत करणारे असले त्यांच्या हातात नारुस्त व खराब बसेस दिल्या जात आहेत, यात किती बस तंदुरुस्त आहे आणि किती नादुरुस्त आहेत याचा कोणीच हिशोब करताना दिसत नाही. आजची वेळ निघाली म्हणजे बस झाले, असाच काहीसा कारभार एसटी महामंडळाचा सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बस पंक्चर झाल्यास स्टेपनी आहे, पण पंक्चर चाक खोलण्यासाठी स्टेपनीसोबत लागणारे पाने औजारे मात्र बसमध्ये नाहीत, अशी काही अवस्था बुधवारी सकाळी चाळीसगाव-जळगाव बसमधून येणार्‍या प्रवाशांना अनुभव आला.
जिल्ह्यात वर्ष दिड वर्षांपासून मध्य रेल्वेच्या पॅसंेंजरसह अन्य सर्वसाधारण प्रवाशांना साध्या तिकीटावर प्रवासाची सवलत नाही. त्यामुळे सर्वच सरकारी कर्मचारी खाजगी नोकरदार, व्यावसायिक मिळेल त्या बसने जळगाव गाठण्याच्या बेतात असतात. आजचीच घटना एमएच २० बीएल २६५७ क्रमांकाची चाळीसगाव-जळगाव बस पाचोरा बसस्थानकातून बुधवारी सकाळी ८.३० वाजता निघाली आणि वडली ते वावडदा दरम्यान या बसचे वाहकाच्या बाजूकडील आतल्या ट्यूब-टायरचा जोरदार आवाज होउन बर्स्ट झाला. या बसमध्ये स्टेपनीचे टायर होते, परंतु पंक्चर झालेले चाक बदलवण्यासाठी नटबोल्ट उघडण्यासाठी आवश्यक असलेले साहीत्य नसल्याने तेथेच हतबल होउन रस्त्याच्या कडेला दुसर्‍या बसची वाट पहात थांबवले. परंतु नाईलाजाने मोठ्या हिमतीने ती बस धीम्या गतीने कशीतरी जळगावात पोचून प्रवाशांना उतरवून डेपोमध्ये रवाना केली. परंतु यात सर्वाचा खोळंबा झाला. यामुळे सरकारी वा खाजगी नोकरीवर येणारे सर्व नागरिक प्रवासी उशिराने जळगावात पोहचले.
असून अडचण नसून खोळंबा
पंक्चर झालेल्या बहुतांश बसेसमध्ये स्टेपनी टायर नसतेच, असली तरी चाकाला असलेले नटबोल्ट काढण्यासाठी पाने वा आवश्यक साहित्यच नसते. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती आहे. त्यामुळे वाटेवरच दुसरी बस येण्याची वाट पहात थांबावे लागते.

दुसरी बस आली तरी ती दुसर्‍या डेपोची म्हणून साहित्य दिले जात नाही. याचबरोबर वेळेवर देखभाल दुरूस्ती न होता, कामचलाउ साहित्य वापरात येत असल्याने वारंवार वाटेतच बंद पडत आहेत. प्रवाश्यांसाठी पर्यायी बस सोडली जात नसल्याने याचा मनस्ताप वाहक-चालकांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे एकेकाळी सुरक्षित प्रवासाचे साधन असलेली, सर्वसामान्यांच्या सोयीची, जाईन तर बसनेच, प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याने दिमाखात धावणारी सर्वसामान्यांची लालपरी खर्‍या अर्थाने लाल डबा झाली असून आर्थीक डबघाईला आली असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here