Breaking

शासनाच्या कोणत्याही योजना व सवलतीचा लाभ घेतांना एजटां पासुन सावध रहा- खा. उन्मेशदादा पाटील

0
300

पाचोरा- राज्य असो की केंद्रसरकार असो कोणतेही सरकार थेट गरजु पर्यंत सदरचा लाभ पोहचण्यासाठी प्रयत्नशिल असते परंतु काही नागरिक एजंटाच्या भुलथापांना बळी पडून अर्थीकसह अनेक बाबींना बळी पडतात याचे मुख्य कारण म्हणजे आपणास जोपण लाभ घ्यावयाचा आहे त्यासाठी लाभार्थीनी सर्वात आधी त्याचा अभ्यास करावा व योग्य ती कागदपत्रांची पुर्तता करून सतत मागोवा ठेवला तर कोणतीही लुट न होता निश्चितच त्यांना त्या योजनेचा थेट फायदा होऊ शकतो


खा. उन्मेशदादानी पुढे बोलतांना सांगीतले सरकारकाच्या विविध हेडखाली एवढया योजना आहेत लाभार्थी त्याचा विचारही करू शकत नाही. शिवाय त्याचा अभ्यास करून सतत मागोवा ठेऊन योजना पदरात देखील पाडून घेऊ शकत नाही
नेमकी ही बाब आमचे भाजप तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटीचे संचालक भुषणदादा मगर यांनी घेरली आणि सदरचे काम अत्यंत योग्य रितीने व्हावे, फक्त नांव नोंदणी करून फायदा नाही तर गरजु जनते पर्यत वेळो-वेळी येणाऱ्या योजना, सवलती जनते पर्यत पोहचण्यासाठी SDM मल्टी सार्व्हिसेसचे प्रोप्रा. संदीप महाजन यांना हे संपुर्ण पॅकेज दिले आहे.
विशेष गर्वाची बाब म्हणजे या वर्षात नदी-नाले एक करून धरणे सर्वत्र 100% भरणारा पाऊस सकाळ पासुन सुरु असतांना देखील या मंगल कार्यालयाची संपुर्ण जागा गरजु जनतेच्या उपस्थीतीमुळे पूर्ण पॅक झाली आहे. काही नागरीकांना बसण्यासाठी जागा नसल्याने निम्यापेक्षा जास्त नागरिक घरी गेलेत त्याचीही दखल आयोजकांनी घ्यावी
विशेषबाब म्हणजे आयोजक अमोलभाऊ शिंदे & डॉ. भुषणदादा मगर तसेच प्रकल्प प्रमुख यांनी ध्येय अँकेडमी & SDM मल्टी सर्व्हीसेसचे संचालक, ध्येय न्युजचे संपादक यांचे प्रामुख्याने मी कौतुक करतो सदरची योजना केंद्र सरकारने जाहीर करून अवघे 8 दिवस सुद्धा होत नाही तोपर्यंत या संपुर्ण टिमने संधीचा फायदा घेत या भव्य मेळाव्याचे आयोजन केले ही बाब कौतुकास्पद आहे.


खा. उन्मेशदादा यांच्या सुचनेला आदेश मानत भा.ज.ता.अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले
🔹 *केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजने संदर्भात प्रथम टप्यात पाचोरा-भडगाव शहरात व दुसऱ्या टप्यात ग्रामीण भागात प्रभाग निहाय कॉर्नर बैठकीचे आयोजन करणार आहोत🔹
म्हणुन आता पुन्हा प्रत्येक श्रमिक माता-पिता, बंधु-भगिनींन पर्यंत ही योजना व त्याची माहिती पोहण्यासाठी या योजनेचे प्रकल्प प्रमुख संदीप महाजनसर हे पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभागात भा ज पा तालुका प्रमुख अमोलभाऊ शिंदे (शिंदे ॲकेडमी) & डॉ. भुषणदादा मगर यांच्या प्रमुख उपस्थीत कॉर्नर मिटींगचे आयोजन करणार आहे त्याची वेळ, दिनांक, ठिकाण हे कॉर्नर बैठकीच्या एक दिवस आधी कळवण्यात येईल पाचोरा-भडगाव शहराच्या प्रत्येक घरा-घरात व
शहरा नंतर असाच उपक्रम ग्रामीण भागासाठी देखील राबववुन प्रत्येक घरात व व्यक्ती पर्यंत ही योजना पोहचण्यासाठी प्रयत्नशिल असलो तरी या योजना प्राप्त करण्यासाठी कोणत्याही आमीषाला बळी पडू नका अथवा कोणालाही पैसे देऊन स्वतःची फसगत करून घेऊ नका शिवाय या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी जात- -पात-धर्म-पक्ष-संघटना असे कोणतेही बंधन नाही प्रत्येक पात्र भारतीय नागरीक या योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही शिंदे यांनी अखेरीस सांगीतले


डॉ. भुषणदादा मगर यांनी शासन समाजातील 95% घटकांना होणाऱ्या आजारावर सुमारे 5 लाखा पर्यंत विविध योजनेखाली विनामुल्य मदत करू शकतात व त्यासर्व सुविधा आमच्या विघ्नहर्ती मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत परंतु अपुर्ण माहिती व कागदपत्रांमुळे नागरीक अशा योजनांचा लाभ न घेता विनाकारणा अर्थींक भुर्दड सोसतात यासाठी आपले सर्व प्रकारचे कागदपत्रे विविध योजना प्राप्त करण्यासाठी पुर्तता करून ठेवणे आवश्यक आहे.


SDM मल्टी सर्व्हिसेसचे प्रोप्रा संदीप महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व्हिस संदर्भात स्पष्ट सांगीतले माझा & आमच्या SDM मल्टीसर्व्हिसेसचा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेचा संबध नाही हा संपुर्ण प्रकल्प वार्षिक सर्व्हिस देण्याच्या पेईंग तत्वावर राबवत आहोत म्हणुन ज्यांच्या कागद पत्रांची पुर्तता असेल & शासकीय नियम-अटीत जे पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल या योजना मिळण्यासाठी किंवा मिळवुन देण्यासाठी युवा नेते अमोलभाऊ शिंदे,डॉ.भुषणदादा मगर यांच्याशी कोणीही संपर्क साधु नये असेही स्पष्ट करतांना सांगितले शासनाच्या कोणत्याही योजना असो त्या तळगळातील जनते पर्यंत आज पर्यंत पोहचत नाही पोहचल्या तर त्या योजना व सवलती प्राप्त करण्यासाठी जे पात्रता धारक आहेत त्यांच्याशी वेळोवेळी वर्षभर सतत संपर्क ठेवुन अपडेट राहणे त्यांना त्या सवलती मिळवुन देणे शक्य व्हावे म्हणुनच अमोलभाऊ शिंदे & डॉ.भुषणदादा मगर यांनी स्वतंत्र जबाबदारी SDM मल्टीसर्व्हीसेसचे संचालक-संदीप महाजन तर ऑनलाईन नोदणीसाठी भडगावरोड श्रेयश हॉस्पीटलच्या तळमजल्या वरील प्रोप्रा. प्रतिक महाजन यांचे साई सर्व्हिसेस Mo.9730819113 तर पुनगाव रोडवरील साई प्रोव्हीजन जवळ गोकुळ डेअरी शेजारी प्रोप्रा. राहुल बाफना यांचे बाफना सर्व्हिसेस Mo.9850479108 यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फॉर्म देखील तेथेच उपलब्ध होणार आहे & त्याच ठिकाणी ऑनलाईन भरले जाणार असुन काही लोक झेरॉक्स काढुन फॉर्म भरत आहे ते स्विकारले तर जाणार तर नाही परंतु या दोघंही ठिकाणी नांव नोंदणी शिवाय इतर कोणत्याही ठिकाणी नांव नोंदणी केली असेल त्या व्यक्तींना आम्ही योजना व सवलती प्राप्त करण्यासाठी त्यांच्याशी वेळोवेळी वर्षभर सतत संपर्क ठेवुन अपडेट करून त्यांना त्या सवलती मिळवुन देणार नाही किंवा सहकार्य करणार नाही असेही संदीप महाजन यांनी अखेरीस सांगीतले कायक्रम अल्पोपहार वाटप करून समाप्त करण्यात आला

🔹पुनश्च विशेष विनंती -स्वतंत्र जबाबदारी SDM मल्टीसर्व्हीसेसचे संचालक-संदीप महाजन तर ऑनलाईन नोदणीसाठी भडगावरोड श्रेयश हॉस्पीटलच्या तळमजल्या वरील प्रोप्रा. प्रतिक महाजन यांचे साई सर्व्हिसेस Mo.9730819113 तर पुनगाव रोडवरील साई प्रोव्हीजन जवळ गोकुळ डेअरी शेजारी प्रोप्रा. राहुल बाफना यांचे बाफना सर्व्हिसेस Mo.9850479108 यांच्याकडे देण्यात आली आहे.🔹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here