Breaking

डॉक्टरांनी स्वतः चे रक्तदान करुन वाचवला मातेसह बाळाचा जीव

0
685

पाचोरा -तालुक्यातील शहापुरे येथील सौ. स्विटी अविनाश खरे ही गरोदर माता अत्यवस्थ अवस्थेत शहरातील हॉस्पिटल चे दार ठोठावत असतांना रुग्णाची गंभीर अवस्था बघुन जळगावी जाण्याचा सल्ला मिळाला. रुग्णाची अवस्था बिकट होती रक्ताचे प्रमाण ४ टक्के तर प्लेटलेट १७ हजार अशा क्रिटिकल अवस्थेत रुग्णाचे सासरे अर्जुन खरे यांना कुठे जावे हे कळत नव्हते रात्री चे बार वाजले होते यावेळी खरे यांचे शहरातील नातेवाईक अरुण ब्राह्मणे मदतीला धावून आले असता त्यांनी ही बाब नंदु सोमवंशी सह कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना सांगितल्यावर श्री. सोमवंशी यांनी तात्काळ लिलावती हॉस्पिटल चे डॉ. वैभव सुर्यवंशी यांना विंनती करुन रुग्णाचे जीवाचे कमीजास्त झाल्यास आम्हीच जबाबदार राहु आपण तात्काळ उपचार सुरू करा. डॉ. सुर्यवंशी यांना एक प्रकारे आव्हान होते.

रक्ताचे प्रमाण कमी आणि त्यात कमी होणार्‍या प्लेटलेट त्यामुळे तात्काळ जळगाव येथुन दोन प्लेटलेट्स च्या पिशवी तर पेशन्ट चे रक्तगट Ab पॉझिटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मिळणे कठीण झाले होते. अशा अवस्थेत स्विटी खरे ची प्रसुतिची वेळ आली पेशन्ट अॉपरेशन करते वेळी योगायोगाने डॉ. सुर्यवंशी यांचा रक्तगट पेशन्टचा असल्याने स्वतः डॉ. सुर्यवंशी यांनी तात्काळ रक्तदान केले आणि स्विटी खरे सह तिच्या बाळाचा जीव वाचविण्यास यश मिळविले आहे. यावेळी हॉस्पिटल चे डॉ. मनोहर शिंपी, सुनिता पाटील, सोनी पाटील, निलेश ब्राह्मणे यांनी मदत केली. खरे परीवाराने डॉक्टर खरोखर देवरुपी असतात याचा प्रत्यय आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here