Breaking

शिवसेनेच्या महालसीकरण शिबीरास प्रचंड प्रतिसाद

0
631

पाचोरा -पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रथमतः कोरोना लाटेची चाहुल लागताच आपल्या मतदार संघासह परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोना लाटेविरुद्ध लढण्यासाठी प्राथमीक औषधोपचारासह संपुर्ण यंत्रणा उभी केली.

किंबहुना रोजगार गेलेल्या गरजुंना योग्य ती मदत पोहचवण्याचे काम देखील आपल्या शिवसैनिकांच्या मदतीने केले. शिवसेनेचे 80% समाजकारण व 20% राजकारण या ब्रिद वाक्याला न्याय देण्याचा प्रयत्न देखील केला व करत आहे त्याचा प्रत्यय आज पाचोरा शहरात अनुभवास आला. शिवसेनेच्यावतीने पाचोरा शहरातील विविध सहा विभागात कोरोना प्रतिबंधात्मक महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महालसीकरण शिबीरात आज तब्बल ७८५३ नागरिकांना लसींचा पहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ घेत शहरात लसीकरणाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यातून शिवसेनेने आपल्या समाजाभिमुख कार्याचा ठसा पुन्हा एकदा पाचोरा शहरवासीयांच्या चेहर्‍यावर दिसुन आला. गेली कित्येक महिन्यांपासुन कोरोना लसीसाठी वणवण भटकणार्‍या सर्वसामान्य नागरीकांना जेव्हा आपल्याच परिसरात शिवसेनेच्या या लसीकरण शिबीराव्दारे कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले त्याचा आनंद जनतेच्या चेहर्‍यावर दिसुन येत होता. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी वण- वण भटकावे लागत होते तर काहींना तासंतास थांबावे लागत होते.या सर्व परिस्थितीची दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी संबधीत प्रशासनाला सुचीत करून शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

त्याचाच परिपाक म्हणजे आज शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरातील शिवतीर्थ पटांगणात, ड्रीम सिटी भागातील पालिकेने विकसित केलेल्या ओपन स्पेस मध्ये तसेच एम आय डी सी कॉलनी परिसरात,राजीव गांधी कॉलनी परिसरात, गणपती मंदिर ओपन स्पेस, संघवी कॉलनी परिसरातील सुनील झोपे यांचे घराशेजारील ओपन स्पेस मध्ये तसेच सिंधी कॉलनी भागातील झुलेलाल मंदिर परिसर अशा सहा ठिकाणी महालसीकारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याठिकाणी शिस्तबद्धरित्या कोविड १९ लसीचा 7853 नागरीकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळत होते.


दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन आमदार सुपूत्र सुमीत किशोरआप्पा पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,आदित्य बिल्दीकर यांनी शिवसेनेच्या स्थानीक पद्‌धिकार्‍यांना हाताशी धरून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले.

शिवसेनेच्या या उपक्रमाचे महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील ,माजी उपजिल्हा प्रमुख ऍड दिनकर देवरे,पप्पू राजपुत, बापू हटकर ,नगरसेवक राम केसवानी,नगरसेवक शीतल सोमवंशी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here