Breaking

जागृती गणेश मंडळाने विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला – मुख्याधिकारी रविंद्र लांडे

0
  • भडगांव -आज मोबाईल च्या जगात सेल्फी मुळे प्रत्येक जण आपल्या पुरते पाहत आहे, पण भडगांव शहरातील जागृत युवकांच्या जागृती मित्र मंडळाने समाजातील तत्कालीन परिस्थितीची जाणीव ठेऊन गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे, असे उदगार भडगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रवींद्र लांडे यांनी गणेशोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.


सामाजिक परिस्थितीचे भान ठेऊन आपण आपला उत्सव साजरे केले पाहिजेत ही जाणीव ठेऊन भडगांव येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जागृती मित्र मंडळाने गणेशोत्सव शासकीय नियमाला अनुसरून साजरा केला. यंदाचे हे मंडळाचे ३८वे वर्ष असून, सद्य स्थितीत करोना मुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, रोजंदारी गेली म्हणून मंडळाने ३८विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शासनातर्फे पुस्तक विद्यार्थ्यांना दिली जातात, पण वह्या विकत घ्याव्या लागतात म्हणून मंडळातर्फे भाजी विक्रेते, शेतमजूर, हातगाडीवाले, ड्रायव्हर इत्याती आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना शालेय साहित्य भडगांव नगरपरिषदेचे मुख्यधिकरी रवींद्र लांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
समाजाचे आपण काही देणे लागतो, समाज आपणास भरभरून देतो पण आपण देखीलसमाजास काहीतरी दिले पाहिजे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त कार्यालय अधीक्षक बापू महाजन, पत्रकार सुनील कासार, प्रा. डॉ. दीपक मराठे, प्रा. सुरेश कोळी, मोठ्या संख्येने पालक व विध्यर्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल परदेशी यांनी तर आभार सुरेश भंडारी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिनेश चौधरी, अजय कोळी, मनोज भांडारकर, तांबतकर इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here