Breaking

पाचोऱ्यात शिवसेनेचा आजच्या महालसीकरण मेळाव्यास
जनतेचा प्रतिसाद; ६५१९ नागरिकांनी घेतला लाभ

0
  • पाचोरा – शहरात शिवसेनेच्या वतीने आज दि.18 सप्टेबर 21 शनिवार रोजी आयोजीत केलेल्या शिवसेनेच्या कोविड १९ प्रतिबंधात्मक महालसीकरणाच्या महामेळ्यास आज पुन्हा एकदा नवीन उच्चांक प्रस्थापित करत ६५१९ नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या लसींचा लाभ घेतला.


गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी & तासं तास तात्काळत उभे राहणे लक्षात घेत शिवाय शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी वण-वण भटकावे लागत होते.

या सर्व बाबींची आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दखल घेत संबधीत प्रशासनासह शिवसेनेच्या पदधिकार्‍यांना शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याच्या सुचना केल्या शिवाय शिवसैनीकांना सेवाभावी तत्वावर शासकीय यंत्रणेला सर्वतोपरी आपल्या भागात सहकार्य करण्याचे आवहान केले. किंबहुना सदरचे लसीकरण शिबिर यशस्वीरित्या राबविले जात आहे की नाही हे पाहणी करण्यासाठी स्वतः लसीकरण केंद्रांवर जाऊन आ.किशोरअप्पा पाटील,मुकुंद अण्णा बिल्दीकर,नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल यांनी लसीकरण ठिकाणी भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीकेले

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदशन व सूचने नुसार आज शहरातील जनता वसाहत, नागसेन नगर वाल्मिकी नगर आदी भागासाठी धमोदय बौद्ध विहारात,देशमुखवाडी व परिसरातील नागरिकांसाठी अहिरसुवर्णकार मंगल कार्यालयात,तसेच उपनगराध्यक्ष पती गंगाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रंगार गल्ली भागातील जनतेसाठी मोर भुवन मध्ये, तसेच कोंडावाडा गल्ली, बाहेरपुरा, त्रंबक नगर या ठिकाणी लसीकरण शिबीर संपन्न झाले.या सर्व ठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळत होते.


सोबतच आ.किशोरअप्पा पाटील यांच्या प्रती आभाराचे भाव उमटतांना दिसत आहेत.महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,नगरसेवक सतीश चेडे, गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, आमदार सुपूत्र सुमीत किशोर पाटील, कु. आदित्य बिल्दीकर, माजी उपनगराध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, सुरेश उर्फ पप्पु राजपुत संदीपराजे पाटील, सुमीत सावंत, महेश पाटील, सौरभ चेडे ,नगरसेवक दादाभाऊ चौधरी , राजू पाटील,छोटू चौधरी ,गणेश पाटील ,प्रमोद सोनार आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here