Breaking

28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

जळगाव: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २८ ते ३० सप्टेंबर, २०२१ या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी दहावी, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, एम.एस.डब्ल्यू, संगणक चालक, आयटीआय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण ३५० रिक्तपदे भरण्याबाबत कळविले आहे. या मेळाव्याचा नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जावून नाव नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या यूजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन ॲप्लाय करावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. मेळावा ऑनलाइन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्तयाकडे नमूद कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असे आवाहन वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here