Breaking

भडगाव तहसिलदार पदी मुकेश हिवाळे रुजु

0

भडगाव – भडगावचे तहसिलदार सागर ढवळे यांची चाळीसगाव येथे अप्पर तहसिलदार पदी बदली झालेली आहे. भडगाव येथे नुतन तहसिलदार पदी मुकेश हिवाळे हे नुकतेच रुजु झाले असुन त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे.

त्यांचे कर्मचार्यांसह नागरीकातुन स्वागत होत आहे. ते जळगाव येथे जिल्हा करमणुक शुल्क अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांची जळगावहुन भडगाव तहसिलदार म्हणुन बदली झाली आहे. ते भडगावी यापुर्वी ५ वर्ष निवासी नायब तहसिलदार व १ महिना भडगावी प्रभारी तहसिलदार पदावरही कार्यरत होते. त्यांनी आतापर्यत भडगाव, पाचोरा, जळगाव अशी एकुण ११ वर्ष चांगली सेवा बजावली आहे. भडगावसह ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली आहे तेथे त्यांची कर्तव्यदक्ष & मनमिळावु, परिस्थींचे जाण असलेले अधिकारी म्हणुन ख्याती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here