Breaking

बांबरुड राणीचे येथे महा लसीकरण शिबिर संपन्न 2500 लोकांनी घेतला लाभ

0

पाचोरा-तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस व ग्रामपंचायत बांबरुड राणीचे यांच्या संयुक्त विद्यमाने & प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा यांचे सहकार्याने दिनांक 27 रोजी महालसीकरण शिबिर संपन्न झाले

या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा न. पा.सभागृहाचे गटनेते संजयनाना वाघ, दगाजीआण्णा वाघ,यांची प्रमुख उपस्थीती होती.

पं. सं. सदस्य ललीतभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबीर शिस्तबद्द रितीने होण्यासाठी पाच बूथ लावून महिला ,पुरुषासाठी वेगवेगळे बूथचे नियोजन करण्यात आले होते.


या शिबीरात 2500 नागरीकांनी लसीचा लाभ घेतला. नागरिकांनी या शिबिरात उत्साहाने लशिकरण करून घेतले यावेळी पं. स.गटनेते ललित वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, बांबरुड राणीचे येथील सरपंच अस्तना तडवी उपसरपंच शशिकांत वाघ ग्रामपंचायत सदस्य गुलाब तडवी, राजेंद्र गवांडे, प्रेमराज शेवगे, प्रदीप वाघ, पिताम्बर बाविस्कर, श्रीमती शोभा वाघ, आली मेवाती, सुभाष शिंदे, विकासो चेअरमन सुधाकर शेळके, बुरहान तडवी गजानन वाघ प्राचार्य डी व्ही पाटील पर्यवेक्षक जी.एन. पाटील निलेश पाटील गौरव पाटील हेमंत पाटील प्रशांत पाटील आदीची प्रमुख उपस्थिती होती तर नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रवीण रायगडे मायाताई सोनवणे श्रीमती गढरी ताई यांच्या विशेष सहभामुळे लसीकरणाच काम चोख व आनंदीदायक वातावरणात संपन्न झाले शिबीर यशस्वीतेसाठी बांबरुड राणीचे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य व पारिश्रम लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here