Breaking

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

0

जळगाव – राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगांव तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज तालुक्यातील 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यातून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना केले.
असे आहेत पात्र लाभार्थी
दापोरा येथील श्रीमती जया ठाकरे, अनुसया तांदळे, देवकाबाई पाटील, भागवत सोनवणे, सुमनबाई तांदळे, जळके येथील श्रीमती सीमा जाधव, शिरसोली येथील श्रीमती वंदनाबाई भोई, कानळदा येथील श्री विष्णू बाविस्कर, श्रीमती सिंधू नन्नवरे, उषाबाई सपकाळे, इंद्रायणी सोनवणे, नलिनी गायकवाड, नशिराबाद येथील श्रीमती अख्तरजहाँ मन्यार, धानवड येथील श्रीमती पिंकीबाई राठोड, फुपनी येथील श्रीमती कमलाबाई सैंदाणे, विदगाव येथील आशाबाई कोळी, तरसोद येथील सुनंदाबाई थोरात, धामणगाव येथील अन्नपूर्णा बाविस्कर, सुलभा सपकाळे आदि लाभार्भ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, जिलहा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), फुपनीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे जळगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, गजानन मालपुरे, प्रमोद सोनवणे, पंकज पाटील, प्रविण पाटील, उमाजी पानगळे व सचिन चौधरी, अव्वल कारकून अर्चना पवार, ज्योती चौधरी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशअप्पा पाटील यांनी केले तर आभार अव्वल कारकून के आर तडवी यांनी मानले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here