Breaking

पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या
गटनेते संजयनाना वाघ यांची मागणी

0

पाचोरा- शहरातील विविध भागांमध्ये संथ गतीने सुरू असलेले रस्ते दुरुस्ती व भुयारी गटारीच्या कामामुळे वाहतुक,अपघात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी आणि नागरिकांना होणार्‍या त्रासातुन मुक्त करावे अशी मागणी पाचोरा नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजयनाना वाघ यांनी केली आहे.

पाचोरा शहरात भुयारी गटारी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळापासून रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत नागरिकांना रस्त्याने वाहने चालवणे तर सोडाच साधे पायी चालणे देखील कठीण झाले आहे पाचोरा शहरातील सर्वात जास्त वाहतूक व वर्दळीसह महत्वपुर्ण बाजारपेठ असलेला भाग म्हणजे स्टेशन रोड होय हा संपुर्ण रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आला आहे पर्यायाने केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा भुयारी गटारीसाठी रस्ता फोडल्यामुळे दोन्ही बाजूने खराब झाल्याचे चित्र स्टेशन रोड परिसरात निर्माण झाले आहे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतांना दिसुन येतो. तसेच नगर परिषदेसमोरील कै. स्वा. सै.आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौकात सतत वाहतूक कोंडी निर्माण होणे नित्याचे झाले आहे त्यामुळे कधी लहान- मोठे अपघात होणे आणि नागरिकांना दररोज वाहतुक ठप्प होत असल्यामुळे रस्त्यावर तासं- तास . खोळंबून उभे राहावे लागत आहे.

याशिवाय सुपडू भादू विद्यालयाजवळ असलेल्या रस्त्याचे देखील तशीच परीस्थीती आहे हा देखील रस्ता दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आला आहे तर दुसर्‍या बाजुला गटारीचे काम देखील सुरू आहे परंतु हे काम कासवगतीनेसुरू असल्याने बाहेरपूरा,देशमुखवाडी,आठवडे बाजारसह लगतच्या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची प्रचंड समस्या झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रकाश टॉकीज चौकात या रस्त्यातील कामामुळे आणि बँकेसमोर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी अनुभवायला येत आहे तर शहरातील गणेश कॉलनी भागात गटारीचे काम सुरू असल्यामुळे गो.से हायस्कूल मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्याच्या अत्याधुनिक व स्पर्धेच्या युगात संपुर्ण यंत्रणा सज्ज असलेल्या एजन्सीला रस्ते दुरुस्तीची कामे देण्याची तरतुद असतांना सदरची कामे संथ गतीने होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारांना प्रलंबित असलेली कामे तातडीने व उत्कृष्ठ दर्जाचे होणेसाठी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी व दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देत वेग वाढवावा अशी मागणी पाचोरा नगरपालीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संजयनाना वाघ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here