Breaking

भडगाव तालुका विधी सेवा समिती तर्फे विधी सेवा व विधी साक्षरता पर जनजागृती अभियानाची सुरुवात

0

भडगाव – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत संपूर्ण भारतात दिनांक 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 पावेतो विधी सेवा व विधी साक्षरता पर जनजागृती अभियान जाहीर करण्यात आलेले आहे. सदर अभियान हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या “न्याय सबके लिये” या ब्रिद वाक्याचे संप्रेरणे प्रमाणे आहे. सदर अभियाना नुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई अंतर्गत विविध जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय अंतर्गत कायदेविषयक साक्षरता व जनजागृतीपर अभियानाची आज पासून सुरुवात करण्यात आली.

त्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी न्यायालय भडगाव व भडगाव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रोजी सदर अभियाना ची भडगाव न्यायालयातून जनजागृतीपर रॅली काढून सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीची सुरुवात भडगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रीना खराटे व सह न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांचे हस्ते फलकाचे अनावरण करून झाली.

तसेच सांगता विधी सेवा समितीचे कार्याबद्दल मार्गदर्शनपर शिबिराने झाली. सदर रॅली मध्ये भडगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सह न्यायाधीश, भडगाव तालुका वकील संघाचे पदाधिकारी, व वकीलवृंद, सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद, आदर्श कन्या विद्यालयाचे शिक्षकवृंद, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदविला.

सदर कार्यक्रमात विधी सेवा समितीचे कार्य व महत्व, विधी सेवा समिती अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सुविधा याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ आर. के. वाणी, ॲड. हेमंत कुलकर्णी यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन ॲड. निलेश तिवारी यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब आहिरे, सचिव ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी, ॲड. एम बी पाटील, ॲड. बी.आर.पाटील, ॲड. के.ए.पवार,ॲड. एच ए कुलकर्णी, ॲड. सुनील सोनावणे, ॲड. विजय महाजन, ॲड. संजिदा शेख, ॲड. हर्षल रणधीर, ॲड. भरत ठाकरे, सर्व वकीलवृंद, न्यायालयाचे अधीक्षक चौधरी नाना, पखाले नाना, लाहोरीया मादाम, ठाकूर भाऊसाहेब, बागड भाऊसाहेब, दायमा भाऊसाहेब, महाजनभाऊसाहेब माळी भाऊसाहेब, सोनजे भाऊसाहेब, शिपाई माळी, राठोड, वाडीले, बिलिफ पंडित पाटील, आदर्श कन्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रोकडे सर, सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक एल के वाणी सर व इतर शिक्षकवृंद, विधी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सदर अभियानाअंतर्गत उद्या दिनांक 3 ऑक्टोबर जागृती वाचनालय, जागृती चौक, भडगाव येथे सकाळी 09.00 वाजता तसेच दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बख्तावरमल चोरडिया अभ्यासिका, वाचनालय गल्ली, भडगाव येथे सकाळी 09.00 वाजता कायदेविषयक जनजागृतीपर शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी व जनतेने सदर शिबिरास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here