Breaking

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री बी जे पाटील यांना निरोप

0

जळगाव – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री बी जे पाटील यांची अहमदनगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आणि जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी आज दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सोडला व जळगाव जिल्ह्यातून कार्यमुक्त झाले.

गेल्या पाच वर्षापासून जळगाव जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरती काम करीत असताना जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली सर्व संघटनांना ते विश्वासात घेत असत विशेषतः वैद्यकीय बिलाच्या बाबती मध्ये त्यांनी प्रत्येक कर्मचार्‍याला न्याय दिला.

जिल्ह्यातील रहिवासी असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन चालण्याचे त्यांनी प्रयत्न केले. अशा सेवाभावी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेतर्फे संघटनेचे सेक्रेटरी प्रा शैलेश राणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

याप्रसंगी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे मानद सचिव मनोहर सूर्यवंशी,प्रा अतुल इंगळे, प्रा मनोज वारके,प्रा राहुल जंगले, प्रा राहुल वराडे ,डॉ सुधीर तांबे मित्र मंडळ सदस्य शैलेंद्र खडके (छोटू दादा), प्रदीप पाटील प्रा डी एम बारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी संदीप डोलारे उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here