Breaking

पाचोरा-भडगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदतीसाठी सरकार दरबारी- आ. किशोरआप्पा आग्रही

0

पाचोरा-भडगाव तालुक्यात शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सप्टेंबर 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या एनआरएफ मदतीच्या निकषाच्या तिन पट मदत द्यावी अशी आग्रही हट्टपुर्वक मागणी आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्याकडे केली 

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. कापुस, मका, सोयाबीन, मुंग, उडीद सर्व पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामातुन खर्च ही निघण्यासारखी परीस्थीती नाही.

याबाबत शक्य तेथे आमदार कीशोरआप्पा पाटील व पदधिकार्‍यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन वस्तुस्थितीचा आढावा घेतला शिवाय थेट फेसबुक लाईव्ह वरून शेतकऱ्यांशी-जनतेशी संवाद साधला पहाणी व चर्चेअंती मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह आघाडीतील संबधित विभागाचे मंत्री, सचिव यांना भेटून दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह झालेल्या नुकसानीच्या धर्तीवर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.

 

त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार किशोरआप्पा यांनी मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांची मुबंईत भेट घेऊन त्यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफीयत मांडली. शिवाय तातडीने दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्यासाठी आणि रब्बी पेरणीसाठी तत्काळ भरीव मदत देण्याची मागणी केली. शासनाने सप्टेंबर 2019 ला पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी ज्या प्रमाणे खास बाब म्हणुन एनआरएफच्या निकषाच्या आधारे तिनपट मदत दिली होती. त्याच धर्तीवर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरकार तर्फे मदत देणेसाठी आमदार किशोरआप्पा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना वस्तुस्थीती मांडण्यास यशस्वी ठरल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

तसेच आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी तातडीने लगेचच राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचीही भेट घेतली. त्याच्यांकडे ओला दुष्काळाची आणि भरीव मदतीची मागणी केली. तर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत आग्रही भुमिका मांडली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील समस्यांसह अडचणीचेही निवेदन दिले. यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील , पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहील,  स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. 

दरम्यान आमदार कीशोरआप्पा पाटील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आघाडी सरकार मधील संबधितांची भेट घेऊन तत्काळ भरपाई कशी मिळेल यासाठी आग्रही भुमिका मांडली असल्याचे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here