Breaking

महाविद्यालये सुरू…पण रेल्वेची मासिकपास सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची होणार गैरसोय कोविड नियंत्रणात पण इतर आजारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0

पाचोरा- शहरासह संपूर्ण राज्यात जून-जुलैनंतर कोरोना संसर्ग प्रादूर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासन, तंत्र शिक्षण विभाग आणि युजीसीच्या निकषानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्ग येणार्‍या जळगाव, धुळे नंदूरबार या तीनही जिल्ह्यातील महाविद्यालये बुधवार २० ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत.
शासकीय परीपत्रका नुसार महाविद्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु झाली आहेत तर जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे यात प्रामुख्याने महाविद्यालयीन युवकांचा देखिल सहभाग आहे.

एकीकडे महाविद्यालये सुरू होणार असली तरी रेल्वे & बस विभागाकडून सवलतीच्या मासिकपास सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याने त्यांच्या उपस्थितीवर मोठ्या प्रमाणावर परीणाम झाल्याचे दिसून आले शाळा- कॉलेज सुरु झालेली असली तर विना सवलती पासेस मुळे महागड्या बसभाड्याचा बोझा विद्यार्थ्यांच्या पालकांचे कंबरडेच मोडणार आहे.


शासन आणि विद्यापीठाच्या निर्देशानुसार सर्वत्र शाळा- महाविद्यालये सुरू होणार असली तरी विद्यार्थ्यांचा शाळा- महाविद्यालय सुरू होण्याचा आनंद काही फार काळ टिकणार नाही. कारण शाळा- महाविद्यालयात येणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून रेल्वे व बसने ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
बोनाफाईड सर्टीफिकेट नसल्याने बसचा अनाठायी खर्च
मध्य रेल्वेच्या पॅसेंजरसह अन्य मेल एक्सप्रेस गाडयांमधून सर्वसामान्य प्रवासी तसेच मासिक पास धारकांना प्रवासाची मान्यता नाही. आणि बर्‍याच शाळा- महाविद्यालयांनी प्रवासासाठी आवश्यक असलेले बोनाफाईड सर्टीफिकेट दिलेले नाही. त्यामुळे रेल्वे बसच्या महागड्या भाड्याने ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारे पाचोरा शहरात निवास करू शकत नाहीत कारण शहरात होस्टेलची व्यवस्था नाही.


नगरपालिका , पं.सं., जि .प., जिल्हा बँक सारख्या निवडणुकीची वाट बघुन वेळे प्रसंगी पक्षाची वैयक्तीक वादविवाद बाजुला ठेऊन विकासा नारा देत ( अर्थात विकास झाला- करायचा पण कोणाचा ?) हा मुद्या मतदारांसाठी अभ्यासाचा असलातरी सत्तेच्या खुर्चीच्या लालसे पोटी एकजुट होणारे राजकीय पक्षाचे पदधिकारी, खासदार, आमदार यांना विद्यार्थ्यांच्या या समस्यांचा-अड्चणीचा सुरक्षीत विसर पडला आहे किंबहुन राजकीय रणधुमाळीत त्यांना या महत्वपुर्ण प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही त्यामुळे आजही बरेचशे विदयार्थी या अडचणीमुळे शालेय-महावियालयीन शिक्षण घेण्या पासुन वंचित आहे


तर दुसऱ्या बाजुला संसर्गाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय फंड उपलब्ध असल्याने त्यासाठी कागदोपत्री असो की सत्यतेची असो जोरदार तयारी केली गेली पण….
चिकुन गुनीया, डेग्यु, इ सारख्या आजारांच्या लाटेने जोर धरलेला असला तरी त्यावर उपाययोजनांकडे प्रशासनाकडून सोईने दूर्लक्ष केले जात आहे
पाचोरा शहरासह संपुर्ण जिल्ह्यात & राज्यात सुदेवाने तुर्त कोरोना संसर्ग प्रादूर्भाव कमी झाला असला तरी तिसर्‍या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा रूग्णालयासह शासकिय वैद्यकिय महाविद्यालय प्रशासनाकडून जोरदार तयारी केली आहे.

मात्र चिकन गुनिया , डोग्यु इ.सारख्या घातक आजाराकडे प्रशासन व खासदार – आमदार सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले असल्याचे दिसते प्रशासनाकडून गेल्या 2 वर्षात कोणतीही डास निर्मूलनात्मक मोहिम व औषधी फवारणी केलेली नाही त्यामुळे डासांची झुंड मोठया प्रमाणावर झाली आहे. एकीकडे कोरोना कमी झाला असला तरी चिकन गुनिया, डेंग्यु यासारख्या आजार असलेल्या रूग्णांमध्ये कैक पटीने वाढ झाली आहे.

या आजारात रूग्ण दगावण्याचे प्रमाण नगण्य असले तरी याचा त्रास दिर्घकालीन परिणाम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डेंग्यू, चिकन गुनियाचे डास निर्मूलना व जन जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर औषधी फवारणी वा धुरळणी मोहिम आखण्यात यावी अशी मागणी ध्येय न्युज च्या वतीने केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here