Breaking

अतिवृष्टीत नुकसान झाल्या नंतरही शेतकर्‍यांना मिळणार्‍या मदत यादीतुन जळगाव जिल्हयाचे नांव वगळले

0

पाचोरा- शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 800 कोटी ची मदतीची यादी काल दि.26 रोजी रोजी जाहीर करण्यात आली मात्र या यादीत पाचोरा-भडगावच नव्हेतर संपुर्ण जळगाव जिल्हयाचे नांव वगळण्यात आले

वास्तवीक जळगाव जिल्ह्यात 5 लाख हेक्टरचे नुकसान होऊनही या मदतीतुन जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले ही महत्वपुर्णबाब आमदार कीशोरआप्पा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तडक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यावर अन्याय झाल्याची बाब लक्षात आणुन दिली

तद्नंतर ना. गुलाबराव पाटील यांनी आज दि.27 रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार कीशोरआप्पा पाटील यांनी सांगीतले.

पाचोर – भडगाव तालुक्यासह संपुर्ण जळगाव जिल्हयात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती.

त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले ही बाब सकाळी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणुन दिली

पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. आमदार किशोरआप्पा पाटील यांचे सोबत स्विय सहाय्यक राजेश पाटील,पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल उपस्थीत होते.


हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भूमिका ना. गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडला. त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असं सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा ही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here