Breaking

ना.वर्षा मॅडम शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?

0

पाचोरा- महाराष्ट्रात तिनचाकी रिक्षा सरकार सत्तेवर आल्या पासुन कोणतेच निर्णय स्थिर अथवा कायम स्वरूपी घेतले जात नाही शिक्षण विभाग तर आंधळ्यांच्या हाती हत्ती सापडल्या नंतर ज्याच्या हाती जसे येते तसे हत्तीच्या रुपाची व्याख्या सांगीतली जात असल्याची गोष्ट आहे तशिच सत्यता या आघाडी सरकारच्या निर्णय व परिपत्रका बाबत विशेषतः शिक्षण विभागा बाबत सत्य ठरत आहे

महाराष्ट्रात जशी प्रत्येक 50 Km ला भाषा बदलते तसे नियम व निर्णय बदलत असल्याचे शिक्षण विभागा बाबत दिसुन येत आहे

कोरोना काळात शाळा सुरु- बंद यावर ठोस निर्णय नव्हते तदनंतर अभ्यासक्रम बाबत एकमत होतांना दिसत नव्हते आता तर जशी जशी दिवाळी जवळ येत आहे तसे तसे शिक्षण विभाग आपले सुटीचे व शाळा सुरु होण्याचे निर्णय जाहीर करीत आहे प्रत्येक दिवसाला नव्हे तर तासा- तासाला बदलत आहे

त्यामुळे शिक्षकांसह पालक व विद्यार्थी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे तरी ना. वर्षाताई यांनी यावर एक स्पष्ट महाराष्ट्र स्तरावर सुटी बाबत परिपत्रक काढणे गरजेचे आहे एवढेच नव्हेतर जळगाव जिल्हा पालक मंत्री ना.गुलाबभाऊ यांच्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विभाग वाऱ्यावर आहे योग्य ती बोली न लागल्यामुळे आजही राजपत्रीत सक्षम अधिकारी दोघंही विभागांना उपलब्ध झालेले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here