Breaking

पाचोर्‍यातील आठवडे बाजार म्हणजे मौत का कुआ हिंदु- मुस्लीम तरुणांमुळे वाचले दोन व्यक्तींचे प्राण

0

पाचोरा- शहरातील आठवडे बाजार म्हटला म्हणजे प्रत्येक शनिवारी बाजार असल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरूप दिसून येते
अर्थात सध्याच्या प्रगत युगात व स्पर्धेतील व्यवसायीक युगात आज दररोज मार्केट उभारले जात असले तरी आजही पाचोरा शहर लगत असलेला खेडे आणि आठवडे बाजार लगत असलेली हिदु- मुस्लीम- दलीत वर्गातील मजुरांमुळे पाचोरा शहरासह आठवडे बाजार संस्कृती आजही जिवंत आहे

याला कारणही तसेच आहे प्रत्येक शनिवारी मजुर वर्गाची आठवड्याची मुजुरी हाती पड़ताच हा मजुर वर्ग आठवडे बाजाराकडे दैनदीन गरजु वस्तु खरेदीसाठी धाव घेतो
परंतु या आठवडे बाजार परिसरा बाबत मात्र कोट्यावधी रुपयांचा भुयारी गटारी विकास कामाचा डंका वाजवणाऱ्या न पा प्रशासनाने व सत्ताधार्‍यांनी धृतराष्ट्रची भुमीका घेतली आहे या आठवडे बाजारात असलेल्या गटारी वरील स्लॅप तुटल्याने जनतेला दररोज मौत का कुआ चा अनुभव घेत जगावे लागत आहे

प्रत्येक शनिवारी वृद्ध, तरुण, बालके महिला- पुरुष पडणे नित्याचे झाले आहे
आज शनिवार दि.6 नोव्हे.दुपारी 3-45 च्या सुमारास
महेंद्र कंपनीची MH 04-HD5410 या क्रमांकाची गाडी या आठवडे बाजारातील खड्यात पलटी झाली काही कळायच्या आत या ठिकाणी हजर असलेले हिंदु- मुस्लीम युवक जगदीश पाटील ( जगु), सरदार भाई, मतीन बगवान, सचीन चौधरी, मतीन टकारी, विनोद पहेलवान, सागर पाटील, अण्णा चौधरी, वसीम शेख,गणेश कोळी , खैरनार ,पवन पाटील या युवकांनी क्षणाचाही विचार न करता हा उसाने भरगच्या भरलेला मेटॅडोर उचलुन गाडी खाली दबलेले गाडी मालक अमोल पाटील, क्लीनर अशोक पाटील यांना सुखरूप बाहेर काढण्यास यशस्वी झाले जर का या तरुणांनी ऐनवेळी धाव घेतली नसती तर दोन व्यक्तीची जिवीतहानी झालीच असती असे प्रत्यक्षदर्शी बघ्यांनी सांगीतले


या संदर्भात अनेक वेळा तक्रारी झाल्या परंतु त्यांना सांगीतले जाते
“न पा प्रशासनाने किती वेळा लोखंडी जाळया बसवल्या पण त्यासुद्धा चोरटे राहु देत नाही असे कारण सांगुन वेळ मारून नेतात”
पाचोरा शहर विकासाचे बिगुल वाजवणार्‍या न पा प्रशासनास & सत्ताधारीना हा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी ठोस काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे नाहीतर तो दिवस दुर नाही ज्या दिवशी या जिवघेण्या खड्यांमुळे एखाद्याचा मृत्यु झाला मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याचे प्रेत न पा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ठेऊन धर्मीय जनता त्याचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.

नगर पालिकेने आजपर्यंत या परिसरातील सर्व धर्मिय जनतेची “अच्छाई देखी है, परंतु जेव्हा सहनशिलतेचा अंत होऊन जनउद्रेक होईल तेव्हा काय? होईल ते काळ आणि वेळच सांगेल म्हणुन सर्व सामान्य जनतेचा अंत न पहाता हा यक्ष प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी नगर पालीकेने काम हाती घ्यावे ही रास्त अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here