Breaking

जळगाव शासकीय विश्राम गृहात मुलीवर अत्याचार ? सत्यता काय?

0

पाचोरा-आज दि.08 नोव्हेंबर रोजी सोशल मिडीयावर व एका वृत्त पत्रात जळगाव शहरातील एका शासकीय विश्राम गृहात राजकीय पदाधिकार्‍याकडून 17 वर्षी मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा असल्याचे वृत्त झळकले आणि संपूर्ण जिल्हाभर या प्रकरणी प्रत्येक कट्ट्या कट्यावर तर काही दुरध्वनीद्वारे अंदाज लावला गेला, चर्चा करीत असल्याचे दिसून आले. सदरच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला जळगाव येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तद्नंतर औरंगाबाद तेथून पुणे हलविल्याचेही वृत्त प्रसारीत झाले.
अशाप्रकारच्या वृत्तामुळे अनेक उलट-सुलट चर्चा रंगविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

ध्येय न्युजच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आव्हान आहे ज्याप्रमाणे स्वत:च्या मतलबासाठी सहकार क्षेत्रात राजकारण नको किंवा आमचा विकास कामांना विरोध नाही हा ठेंबा मिरवत जेव्हा एकजुटीचा नारा देतात त्याप्रमाणे आज या वृत्तासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुट होवून नेमकी या प्रकरणी सत्यता काय ? 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर खरोखर अन्याय झाला असेल तर ज्या कोणी हरामखोराने अल्पवयीन मुलीसोबत काळे तोंड केले असेल अशांना सर्व राजकीय नेते आमदार-खासदार यांनी एकजुट होवून अशा हरामखोराचा खरा चेहरा समोर आणणे अपेक्षीत आहे. आणि जर का अशा प्रकारची चुकीची अफवा फैलवून एखाद्या राजकीय नेत्याचे किंबहुना आमदार-खासदाराचे राजकीय व सामाजिक जिवनच उध्वस्त होत असेल तर अशा वृत्तीला देखिल ब्रेक लावणे गरजेचे झाले आहे. आजमितीस अशा स्वरूपाच्या घाणरेड्या आरोपाच्या चक्रव्युहात अडकून प्रीप्लॅनिंग चक्रव्युहामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे लोकप्रतिनिधींचे राजकीय व सामाजिक जिवनच उध्वस्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकजुट होवून सहकार क्षेत्रात राजकारण नको हा नारा देत सर्वपक्षीय नेते व आमदार-खासदारांनी ज्याप्रमाणे बैठका लावल्या त्याप्रमाणे याबाबत देखिल तातडीने एकजुटीची बैठक लावून सोशल मिडीया व वृत्तपत्रावर झळकलेल्या नरोबा-कुंजोबा वृत्ताचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा राजकीय जिवन उभारणीसाठी कित्येक वर्ष तप करून जेव्हा शिखर गाठण्याचे दिवस असतात अशा स्वरूपाचे आरोप झाले तर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यात सर्वश्रूत आहे. शिवाय जर काही घटना सत्य असतील तर सत्तेमुळे मस्तावलेल्या नेत्याने जर का अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असेल तर त्याचे काळे तोंड करून गाढवावरून धिंड काढण्यासाठी सत्य समोर आणण्याची जिल्ह्यातील सर्वच राजकीय प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींची जबाबदारी येवून ठेपली आहे. शेवटी अपेक्षा एवढीच चुकीला माफी नाही आणि चुक न करताही केवळ राजकीय द्वेष व आगामी निवडणूकांमध्ये सत्तेच्या लालसे पोटी आपल्या विरोधकाची सामाजिक बदनामी करण्याचे षडयंत्र कोणी रचत असेल तर अशा षंडाचा चेहरा देखिल जनतेसमोर आणणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here