Breaking

बोरखेडे बु. ता चाळीसगाव येथे अभूतपूर्व असा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न

0


पाचोरा- चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे येथील रहिवाशी आबासाहेब श्री रामराव बळीराम पाटील ( से. नि. माध्य. शिक्षक) यांचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच बोरखेडे बु. ता. चाळीसगाव येथे संपन्न झाला. त्यांनी आपल्या सेवाकाळात रा. स. शि. प्रसारक मंडळाच्या गोंडगाव, वाघळी,हिरापूर व रा. कन्या विद्यालय चाळीसगाव येथे सेवा बजावली.

शिक्षकी पेशात काम करुन त्या पेशाची उंची वाढविली. एक नामांकित शिक्षक, निगर्वी व आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. फक्त स्वतः चाच विचार न करता सर्व भावंडांना शिक्षित करुन एक संपन्न जीवनाचा मार्ग दाखवून समाजापुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला. संघर्षमय जीवन जगत असतांना योगाभ्यासाद्वारे स्वतः चे आरोग्य उत्तम राखले.

अशा या निकम कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीचा कृतज्ञता सोहळा त्यांच्या तिघही मुलांनी श्री. रमेश पाटील ( प्रा. शिक्षक) डॉ. दिनेश पाटील व डॉ. योगेश पाटील यांनी आयोजित केला होता. शोभा यात्रा, सत्कार व मनोगत, सुरुची भोजन, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे किर्तन असे या कार्यक्रमाचे स्वरुप
होते.

कार्यक्रमप्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री. मंगेशजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची व विविध प्रा. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न करण्याकामी कुटुंबियांसमवेत बोरखेडे बु. येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here