Breaking

वंचित बहुजन आघाडी स्थानीक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविणार – जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे

0

पाचोरा – शहरात वंचित बहुजन आघाडीतर्फे स्व.राजीव गांधी टाऊन हॉल येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रमोद इंगळे होते. तर त्यांच्या समेवेत व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यालय सचिव वैभव शिवतारे. जितेंद्र केदार जळगाव . अनिल केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

याप्रसंगी वैभव शिवतारे यांनी वंचित बहुजन आघाडीचे कामकाज व केलेल्या कामांची माहिती दिली.तसेच कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना व न्याय हक्कापासुन वंचित असलेल्या रंजले गांजलेल्यांना न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करीत आहे . जिल्हा अध्यक्ष आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांचे महत्व आणि त्यांनी करावयाची जनहितार्थ कार्य याचे महत्व पटवुन देते योग्य व्यक्ती आपल्या सोबत आल्यास त्यांना योग्य ते स्थान व देऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे 

कार्यकर्त्यांमुळे पक्ष वाढीला जातो वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचे काम जोरदार आहे तसेच कोणावरही अन्याय होत असेल तर आपला पक्ष हा सर्वांच्या पाठीशी आहे असे वचन प्रमोद इंगळे यांनी कार्यकर्त्यांना दिले यावेळी अनेकांनी वंचीत बहुजन पक्षामध्ये प्रवेश केला  या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून मोर्चा बांधणीला लागावे यावेळी वंचित बहुजन आघाडी ची तालुका कार्यकारणी जाहीर केली.
या मेळाव्याचे आयोजन विशाल बागुल यांनी केले होते.

यावेळी विशाल बागुल यांनी सांगितले की संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी साखळी तयार करून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काम करण्यास प्रयत्नशिल राहु या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम चौधरी सर तर आभार विशाल बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मराठे.प्रमोद सोनवणे.गौतम बागुल आदिंनी परिक्षम घेतले यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदविला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here