Breaking

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का….! बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंग -अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

0

पाचौरा-येथील पाचोरा ग्रामीण सह-संवेदनाहारी शिवसेनेला गल्याचे दिसत आहे

भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेचे बुरुज ढासाळायला सुरु केले आहे नुकताच शिवसेनेचे एकमेव पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक शिवसैनीकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मा.मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

या घटनेला काही होत नाही तोच गेल्या काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होती.

आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ पासुन सुरुंग लावण्यास प्रारंभ केला असुन या प्रभातील महत्वपुर्ण शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखून लवकरच शहरांतील महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव दोघं तालुके मिळुन भव्य असा प्रवेश सोहळा मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे परत एकदा अमोलभाऊ शिंदे यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी डॉ.भुषण मगर,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस दिपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड, टिपू देशमुख,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,समाधान पाटील,हरीश पाटील उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here