Breaking

यात्रा कमेटीच्या निर्णया पेक्षा जनतेच्या भावनांचा व श्रध्देचा सकारात्मक विचार करून काकणबर्डी यात्रा प्रारंभ करण्यात यावी – सचिनदादा सोमवंशी

0
  1. पाचौरा – तालुकाच नवे तर पंचक्रोसायन जनते आस्थेचा विषय मूला काकण्टी यात्रेला परवानगी देण्यात या वीसी मागणी कॉंग्रेस ने उपविभागीय अधिकारी य्याना अभिक्रिया व्दारेली के आहे


पाचोरा शहरा लगत असलेल्या काकणबर्डी येथे खंडोबा रायाचे जागृत देवस्थान आहे नव्हेतर त्याची आख्यायिका देखील आहे त्यामुळे याठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी भाविक आपल्या घरी तळी उठवुन तर काही तळी उठवण्या आधी सह परिवार दर्शनासाठी येतात किंबहुना त्यादिवशी काकणबर्डीच्या परिसरात नवस देखील फेडण्याची प्रथा आहे.

यात्रेचे मोठे स्वरूप असल्याने किमान हजार – पंधराशे सर्व धर्मीय कुंटूब लहान- मोठी दुकाने या ठिकाणी थाटतात & त्या दिवसा पासुनच पंचक्रोशीतील सावखेडा, माहीती, गोराडखेडा येथील यात्रा प्रारंभ हेण्याची प्रथा आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शासकीय पातळीवर यात्रा, आठवडे बाजार आदीवर निर्बध असल्याने सर्वच यात्रा -आठवडे बाजार रद् करण्यात आले होते
मात्र यंदाच्या वर्षी बर्‍याच प्रमाणात कोरोना चा अटकाव झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात यात्रा होत आहे त्याच अटी शर्थीवर काकणबर्डी यात्रेला परवानगी देण्यात येईल असे गृहीत धरून व्यवसाईकांनी पुर्व तयारी सुरु केली होती किंबहुन मोठ्या प्रमाणवर खर्च देखील केला होता

परंतु सदरची यात्रा रद् करण्यात आल्याचे प्रशासकीय पातळी वरुन जाहीर होताच शहरात व परिसरात एकच चर्चेचा विषय ठरला त्यामुळे सदरचा विषय हिंदु धर्मीयांचा आस्थेचा असल्यामुळे जनता हिंदु धर्मीय संघटने कडून सदर प्रकरणी आवाज उचलला जाईल या अपेक्षेत होती परंतु मतांच्या लाचारीत या हिंदुत्ववादी संघटना कुंभकर्णी झोपेत एवढया बुडाल्या की त्यांना या अध्यात्म व ग्राम देवताच्या आस्थेचा विसरच पडला


अखेर कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदलसाहेब यांना निवेदन देऊन सदरच्या यात्रेवरी बंदी उठवण्याची निवेदनाव्दारे मागणी केली. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, महीला जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, सरचिटणीस संगिता नेवे, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, प्रदिप चौधरी, युवक काँग्रेसचे प्रविण पाटील, संजय सोनार आदी उपस्थित होते.

सदर प्रकरणी पाचोरा तहसीलदार कैलास चावडेसाहेब, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील साहेब यांच्याशी चर्चा केली असता चर्चेअंती समजले की यात्रा शासकीय पातळीहुन नव्हे तर यात्रा कमिटीनेच लेखी पत्र देऊन यात्रेला परवानगी देवु नये असे सांगीतल्याने प्रशासनाने शासकीय पातळीवर यात्रा रद् केल्याचे समजले


सदर प्रकरणी ध्येय न्युजचा जाहीर प्रश्न आहे काकणबर्डी यात्रा कमेटी शासकीय पातळीवर मान्यता प्राप्त आहे का? सदरचे खंडेरायाचे ठिकाण खाजगी कधी पासुन कार्यान्वीत झाले जर ते खाजगी आहे तर आज पर्यंत त्यावर पर्यटन विकास अंतर्गत दुरुस्ती & सुशोभिकरणासाठी जनेतेच्या पेशाची उधळपट्टी का? करण्यात आली. कोणतेही देवस्थान हे सार्वजनीक श्रद्धेचे झाल्या नंतर त्यावर निर्बंध लावण्याचे बोटावर मोजण्या एवढे सदस्य असलेल्या यात्रा कमेटीला कोणी? दिले यासर्व बाबींसह जनतेच्या भावनांचा व श्रध्देचा सकारात्मक विचार करून यात्रा प्रारंभ करण्यात यावी ही अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here