Breaking

पाचोरा खान्देश आर्मी ग्रृप द्वारा महिलांसाठी
भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0

पाचोरा- शहरात खान्देश आर्मी ग्रृपव्दारा आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यभर नव्हेतर लगतचे राज्यांमध्ये देखील चर्चेचा विषय असतो म्हणुनच भव्य बक्षीसांचा वर्षाव असेलेल्या या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यासह लगतच्या राज्याचेही खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात


बहुप्रतिक्षेत असलेल्या या भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि.12 जाने.2022 बुधवार रोजी सकाळी 8-00 वाजता करण्यात आले आहे यावर्षी सदरची मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यापुरता मर्यादीत असुन महिलांसाठी 1600 मिटर अंतर निश्चित करण्यात आले आहे.


प्रथम बक्षीस 31000 द्वितीय बक्षीस 21000 तृतीय बक्षीस 11000 चतुर्थ बक्षीस 7000 पाचवे बक्षीस 5000 यासह सर्वोत्कृष्ट 15 खेळाडूंना विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे स्पर्धेचा प्रारंभ पाचोरा शहरातील श्री शेठ एम एम महाविद्यालय या प्रांगणातून होणार आहे
स्पर्धेत सहभागी असलेला प्रत्येक खेळाडू जो फायनल बॉर्डर पर्यंत पोहोचेल अशा खेळाडूस राज्यस्तरीय प्रमाणपत्र दिले जाणार आहे

विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्या सर्व महिला खेळाडूंसाठी निवासा सह जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस संरक्षणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या स्पर्धेचे लाइव्ह प्रक्षेपण प्रसारित होणार आहे यासाठी प्रवेश फी रुपये तीनशे निश्चित करण्यात आली असून सदरची रक्कम गुगल पे फोन पे द्वारे 99 22 28 98 69 यावर स्वीकारली जाणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने सदरच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान आर्मी ग्रुप खानदेश संस्थापक अध्यक्ष रोहित महाजन यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here