Breaking

पाचोरा मतदार संघातील रस्ता अनुदानासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजुर कामांना लवकरच प्रारंभ-आ. किशोरआप्पा पाटील

0


पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी आ.किशोरआप्पा पाटील यांनी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ध्येय न्युजशी बोलतांना आ.किशोरआप्पा पाटील यांनी दिली.

वेळो-वेळी या रस्त्यांची दुरुस्तीची मागणी स्थानिक जनतेने लावून धरली होती त्याची दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा सतत सुरु ठेवला अखेर त्यांच्या चिकाटीला व शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आणि अखेर पुढील कामांची मंजुरी होऊन तब्बल 16 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध देखील झाला


———-–—————–
असे आहेत रस्त्यांची मंजुर कामे & उपलब्ध निधी ⭐पाचोरा तालुक्यातील सामनेर दहिगाव दरम्यान सुमारे साडेचार किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये ⭐सारोळा-मोंढाळा दरम्यान असलेल्या सुमारे चार किलो मीटर रस्त्यासाठी अडीच कोटी, ⭐चिंचखेडा गाळण दरम्यान असलेल्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपये ,⭐लासगाव बांबरुड दरम्यान चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये ⭐ भडगाव तालुक्यातील आर्वी शिरूड-पळासखेडे -भडगाव दरम्यान सुमारे नऊ किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये ⭐भडगाव वलवाडी रस्ता सुधारणेकामी अडीच कोटी रुपये ,⭐कजगाव -पारोळा रस्ता सुधारणा करणे अडीच कोटी रुपये

या प्रमाणे कामे व त्यावर खर्च होणारी रक्कम मंजूर झाले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे आ. किशोरआप्पा पाटील यांनी ध्येय न्युजशी बोलतांना सांगितले.दरम्यान या कामांच्या मंजुरीबद्दल आ.किशोरआप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, सार्वजनीक बांधकाम मंत्री,ना.अशोक चव्हाण,पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ध्येय न्युजशी पुढे बोलतांना आ. किशोरआप्पा पाटील यांनी सांगीतले रस्ते दुरुस्ती कामासाठी आपले कायमच प्राधान्य राहिले असुन मतदारसंघातील इतर नवीन व दुरुस्ती करावयाच्या रस्त्यांच्या कामासाठी देखील आपला सतत पाठपुरावा सुरूच आहे. व राहिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here