Breaking

कळमसरे येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी - देवकर हॉस्पिटल व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

0

जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी कळमसरा (ता. पाचोरा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.

कळमसरा येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. कळमसरा येथील सरपंच अशोक चौधरी व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे.

शिबिरात डॉ. मनोज पाटील (न्यूरोलॉजिस्ट), डॉ अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ श्रीराम महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ अभिजित पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. अनुश्री व्ही (एम. डी. मेडिसीन), डॉ वृषाली पाटील (नेत्ररोग तज्ञ), डॉ. नीरज चौधरी (मूत्र विकार तज्ञ), डॉ. अतुल सोनार (एमडी पॅथॉलॉजी), डॉ वैभव गिरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ रोहन पाटील (लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जन), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. स्वप्नील गिरी (बाल रोग तज्ञ), डॉ प्रियांका चौधरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. आदित्य नागराजन (त्वचारोग तज्ञ), डॉ अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ अश्विनी चव्हाण (दंतरोग तज्ञ) हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.

गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वाटपही या शिबिरात केले जाईल. शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रुग्णालय व महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here