Breaking

प्रांताधिकारी निवासस्थानाचे आ.किशोरआप्पा पाटील यांचे हस्ते भूमिपूजन

0

पाचोरा-शहर व विधानसभा मतदार संघात महसुल- पोलीस प्रशासनासह जवळ-जवळ सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानाचा यक्ष प्रश्न आजही आहे. प्रामुख्याने यामध्ये महसुल व पोलीस विभाग यांच्या निवासाचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवणे ही बाब महत्वपुर्ण व प्राधान्याची असल्याचे लक्षात घेऊन आमदार किशोरआप्पा यांनी सतत पाठपुरावा केला

याचा परिणाम
पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्या हक्काच्या निवासाची सोय प्राप्त झाली नव्हेतर शासकीय स्तरावर सर्व मान्यता प्राप्तीसह आ.किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यामूळे प्रांताधिकारी निवास उभारणीस सुमारे ५९ लक्ष रुपयांची मंजुरी देखील मीळाली भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रांतअधिकारी शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. तर खुशाल जोशी यांनी विधिवत भुमीपूजन केले याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार ,ज्युनियर अभियंता काजवे माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, बालाजी गृपचे नंदू पाटील,
प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here