Breaking

आ. किशोरआप्पांनी सत्तेची फळे चाखतांना शिवसेनेचा भुतकाळ विसरू नये…..
व पाचोर्‍यात पत्रकारीतेची दशा & दिशा… – एक विचारमंथन

0

पाचोरा-मुंबई जिंकल्या नंतर आता “80% समाजकारण 20% राजकारण हे तत्व स्विकारुन “गांव तेथे शिवसेनेची शाखा” असा नारा देत शिवसेनेचा झंझावात संपुर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यावेळी तात्कालीन परिस्थीती अशी होती की, शिवसेना म्हणजे गुंडांची सेना- असा प्रसार राजकीय & शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर होता.
अर्थात स्व.बाळासाहेबांचा आदेश पाळणारा व शिवसेनेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिवसैनीकच्या कुंडलीत पोलीस केसेस असायच्याच. ज्याच्यावर पोलीस केस नाही तो शिवसैनीकच नाही..! हे समीकरण सर्वश्रृत होते, किंबहुना शिवसेना नेत्यांच्या प्रत्येक भाषणात संत तुकाराम महाराजांचा यांची एक ओळ ऐकायला मिळायचे की,

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा”
परंतु शिवसेच्या सभेत सांगीतले जायचे “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या हाती असावा शिवसेनेचा भगवा झेंडा, त्याला असावा मोठा दांडा, आणि त्याच्याने त्याने फोडावा भ्रष्टाचाराचा हंडा!

अशा विविध ज्वलंत विचार व भाषाणांनी स्व.बाळासाहेबांच्या विचारांनी झपाटलेले शिवसैनिक सर्वत्र तयार झाले. पाचोरा पंचक्रोशीतील उदाहरण द्यावयाचे झाले तर, पिंपळगाव हरे. येथील माजी तालुका प्रमुख व जि. प. सदस्य स्व. विजयसिंग देशमुख म्हणजे विना चप्पल, बळीराजाला शोभेसे अंगावर कपडे, गळयात भगवा रुमाल, निस्वार्थी – निर्भिड कट्टर शिवसैनिक…! असे हे मोकळ्या मनाचं आणि फाटक्या तोंडाचं फर्डे व्यक्तिमत्व पंचक्रोशितील सर्वाच्या हृदयावर राज्य करीत विजुभाऊ म्हणुन परिचीत होते.
विशेषबाब म्हणजे केंद्रात, राज्यात, स्थानीक पातळीवर कोणतीही सत्ता नसतांना उलट तडीपारी सारख्या केसेस शिवसैनीकांच्या कुंडलीत असतांच्या काळात विजुभाऊंचा भ्रष्ट अधिकार्‍यांवर & अवैध धंदे वाल्यांवर प्रचंड दबदबा होता.

ज्या प्रमाणे शोले चित्रपटात “यहाँ से पचास-पचास कोस दुर गांव मे बच्चा रोता है, तो मॉ कहती है बेटा सो जा, नही तो गब्बरसिंग आजाएगा” हा डायलॉग जसा प्रसिद्ध झाला होता तसा सत्यतेमध्ये पिंपळगाव हरे. पो.स्टे.हद्दीत व पंचक्रोशीत सुद्धा असाच डॉयलॉग अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रसिद्ध होता “बेटा अवैध धंदा कर, पण सांभाळून नाहीतर विजयसिंग( विजुभाऊ) येऊन जातील” आणि व्हायचे देखील स्व.विजुभाऊंच्या अंगी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कमरेत लाथ मारण्याची & हातभट्टी दारू वाल्याची धिंड काढण्याची नैतिकता तेवढी विजुभाऊ सारख्या निष्कलंक शिवसैनीकां मध्ये होती. हा सत्य इतिहास आजही सर्वाना माहीत आहे.
परंतु
हा एवढा एतिहासीक लेखी प्रपंच करण्यामागील कारण म्हणजे, भाजप- सेना युतीत अमळनेर- पाचोरा विधानसभेची जागा बदल झाली होती तेव्हा तात्कालीन परिस्थीतीत स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना “पाचोरा येथील विधानसभेची जागा पुनःश्च शिवसेनेलाच मिळावी” हे साकडे घालण्यासाठी हा निर्णय बदलासाठी स्व. विजयभाऊंचा सिंहांचा वाटा होता. म्हणुनच अशा त्यागी शिवसैनिकांच्या जोरावर पाचोरा विधानसभा मतदार संघातुन स्व. तात्यासाहेब यांना दोनवेळा तर विद्यमान आमदार किशोरआप्पा यांना दोनवेळा विधानसभेत शिवसेना आमदार म्हणुन जाण्याची संधी आज मिळाली. परंतु सत्तेच्या मोहात व विकास कामांच्या धुंदीत आमदार किशोरआप्पा शिवसैनिकांचा त्याग आणि ब्रिद वाक्य विसरले आहेत…. अशी म्हणायची वेळ आली आहे.

घडले असे, .. पाचोरा शहरातील त्र्यंबकनगर भाग म्हणजे आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विशेष म्हणजे विद्यमान नगरसेवक आणि येणार्‍या न. पा. निवडणुकीत या भागातुन शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येणार..!!! हे आज तरी चित्र स्पष्ट आहे. परंतु

महाराष्ट्रात ठाकरे परिवारातील शिवसेनेचा मुख्यमंत्री, विधानसभेत त्या मतदार संघातील आमदार शिवसेनेचा त्या भागातील नगरसेवक शिवसेनेचा असतांना

चक्क शिवसेनेच्या पदधिकार्‍याला देवीमंदिर व शाळेच्या पाठीमागे असलेल्या गावठी दारू बंदीसाठी निवेदन द्यावे लागते… ही अत्यंत करूण शोकांतिका आहे. अखेर गावठी दारू बंद झाली नाही म्हणुन स्वखर्चातून फलक लावण्याची वाईट वेळ येते. यापेक्षाही वरचढ बाब (कहर) म्हणजे नंतर त्यामुळे त्या शिवसेना पदाधिकाऱ्यांला कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले, फोन फिरवावे लागले, वगैरे.. ही चर्चा सर्वत्र आहे.
आणि तसाच काहीसा त्रास कुरंगी येथील नागरीकांनाही सहन करावा लागला- हे सर्वश्रृत आहे.
एक अनुभव सारोळा प्रकरणी मी स्वतः घेतला आहे. परंतु सदर प्रकरणी माझे दुर्देव आहे की, त्या प्रकरणी मला संबधीतांनी प्रतीज्ञा पत्र दिले नाही.. त्यामुळे माझा नाईलाज झाला. परंतु एवढे निश्चित ध्येय न्युजच्या बातमीमुळे एकच प्रकरणी दोन गुन्हें दाखल झाले. दिवसभर VC च्या सामोरे जावे लागले. अर्थात सदरचे प्रकरण अजुन थांबलेले नाही… योग्य वेळी- योग्य त्या मान्यवरां समोर सादर होणारच आहे.! त्याचे पुनच्छ वर्णन करावे असे मला आज तरी योग्य वाटत नाही.

अशा अनेक प्रकरणांच्या फार मोठं- मोठ्या गाथा आहेत. आज ही फक्त तिनच उदाहरणे आपल्या समोर देत आहे.
किशोरआप्पा शिवसेनेचे आमदार होण्याआधी पोलीस होते. त्यामुळे त्यांना नव्याने उजळणी करून देणे योग्य होणार नाही. परंतु आमदार किशोर आप्पां शिवसेनेच्या सत्तेची फळे चाखत असतांना स्व. विजु भाऊंसारख्या शिवसैकांचा त्याग विसरु नये. ज्या पदधिकार्‍यासाठी काही वर्षापुर्वी स्वतः आमदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनात प्रतिष्ठापणाला लावली होती आज त्याच पदधिकार्‍याने जनहिताची योग्य मागणी केली तर त्याला नको त्या लोकांच्या विनवण्या कराव्या लागल्या. जनता आता बोलत नाही परंतु वेळ आल्यावर..
“पैसा कितीही पेरला तरी, जनता निसटता विजय व निसटता पराभव सुद्धा दाखवुन देते” ही अनुभवाची शिदोरी आप्पासाहेबां सोबत आहे.
म्हणून कोणत्या अधिकार्‍याला किती राजश्रय द्यावयाचा आणि त्यांच्यावर आपल्या नैतीकतेची पकड किती ठेवायची हे वेळीच लक्षात घेणे योग्य ठरेल…!

हीच वेळ आता पाचोरा येथील पत्रकार बांधवांना देखील आत्मपरिक्षणाची आहे. पत्रकार दिनी पाचोरा शहरात पुर्वी पत्रकारांचा सन्मान केला जायचा, पत्रकार परिषदेला सन्माने आमंत्रित केले जायचे, योग्य वेळी योग्य तो सन्मान शासकीय व राजकीय दरबारी केला जायचा. राजकीय व शासकीय मान्यवरांच्या किती? जवळ किती? लांब राहवयाचे याची मर्यादा पत्रकारांमध्ये जोपासली जायची.

एवढेच काय? पुर्वी जे पण शासकीय अधिकारी पाचोर्‍यात कार्यकाळ करून गेले ते सुद्धा सांगतील, किंबहुना आजही अनेक पत्रकार गर्वाने सांगतील पाचोरा शहरातील पत्रकारितेला कोणत्याच विभागाकडून आर्थिक मासीक पाकीटांची किड लागु दिली नाही.

परंतु आता दिवाळी फराळ व शुभेच्छा भेटीची संख्या & आयोजकांना त्यासाठी गाडीच्या चार-चार चकरा मारण्याची धावपळ ऐनवेळी उडालेली धांदल पाहता राजकीय - शासकीय मान्यवरांनी कार्यक्रमांना बोलवणे तर सोडा एखाद्या मोठया घरच्या लग्न असलेल्या लग्न घरवाल्यास सुद्धा पत्रकार म्हणून निमंत्रण देण्यास पाचोर्‍यात भिती वाटते- अशी वाईट स्थीती निर्माण झाली आहे.

यावेळी पत्रकार दिनी पाचोरा शहरात पत्रकारांचा सन्मान करण्याचा विसर पडला आहे. असे म्हणणे योग्य होणार नाही. मात्र मुद्याम का? टाळण्यात आले ? हा देखील पाचोरा येथील पत्रकरीता क्षेत्रातील नैतीक नितीमुल्ले जोपासणार्‍या : पत्रकारांना आत्मचिंतनाचा विषय आहे..?

पत्रकार म्हणुन पाचोर्‍यात समाजात वावरतांना बघीतले तर ज्यांना मराठी शुद्ध बोलता येत नाही, लिहीता येत नाही & सोबतच वाचन व व्याकरणाचा अभ्यास नसलेल्या, फक्त कॉपी पेस्ट करणार्‍या लोकांना पत्रकार म्हणुन वावरतांना बघीतले तर शरमेने मान खाली जाते.
असे चित्र आज पाचोर्‍यात निर्माण झाले आहे. पत्रकारांच्या पाठीशी संकटकाळी उभे न राहणार्‍या, फक्त पावत्या फाडून पैसे जमा करणार्‍या पत्रकार संघटनेत व अशा पोटभरू पत्रकारां सोबत राहुन संघटन करण्यापेक्षा, प्रत्येक पत्रकाराने परिणामांची चिंता न करता व्यक्ती स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य याचा अतिरेक न करता आपल्या स्वतःच्या लेखणीतुन नैतिकतेची दहशत निर्माण करण्याची वेळ आली आहे. पत्रकार म्हणून तुमच्यामध्ये क्षमता असतील तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही म्हणून तुम्हाला प्रत्येकाला तुमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची आज गरज आहे.

( वाचकां विनंती आपणास जर माझे लिखा हुआ आवडले असेल तर ही बातीतर इत्र टेक्स्टवा हि विनंती )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here