Breaking

कर्मचारी सह. पतपेढी चेअरमनपदी सौ.प्रमीला वाघ यांची निवड

0

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षणसंस्थ्या संचलीत पाचोरा शहरातील श्री.गो.से.हायस्कूल कर्मचारी सह.पतपेढी मर्या. पाचोरा जि.जळगाव म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक अडचणीच्यावेळी माय-बाप ठरून ऐनवेळी आर्थिक मदतीचा हात देणारी संस्था म्हणून नांवलौकीक आहे. आज पावेती या पतपेढीची पद् धिकार्‍यांची निवड ही खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने बिनविरोध होत असल्याचा इतिहास आहे हीच परंपरा कायम ठेवत पुढील नुतन नवनिर्वाचित व्यवस्थापक समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.

बांबरूड राणिचे येथील माजी सरपंच तथा पाचोरा जिल्हा मध्यवर्ती बँक लि. शाखेचे व्यवस्थापक श्री. मधुकारआण्णा वाघ यांच्या पत्नी सौ. प्रमिला मधुकर वाघ यांची चेअरमनपदी तर व्हा.चेअरपदी अजय भास्कर अहिरे ,सचिव पदी रामकृष्ण लहू पाटील यांची निवड करण्यात आली.व्यवस्थापक समितीचे सदस्य म्हणून अरूण कुमावत ,संगिता पाटील , .महेश कौंडिण्य ,संजय करंदे ,. रवींद्र बोरसे ,प्रशांत नैनाव ,.सुखदा पाटील, . विजय महाजन संचालकपदी बिनविरोध करण्यात आली निवडझालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याध्यापक सुधीर पाटील सर यांच्याहस्ते करण्यात आला तर पतपेढीचे माजी चेअरमन मुख्याध्यापक बि.डी. बोरूडे यांनी नुतन चेअरमन सौ. वाघ यांच्या हाती पतसंस्थेचा कार्यभार सुपूर्द केला यावेळी पर्यवेक्षक आर. एल.पाटील, ए बी अहिरे, एन आर पाटील,
तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील,किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते.सर्व नुतन पद् धिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, मानद सचिव अॕड. महेशदादा देशमुख, व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन आण्णासाहेब वासुदेव महाजन यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here