Breaking

पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कुलच्या मागील बाजुस असलेल्या थेपडे नगरमधील खुला भुखंडाचा विकास वादाच्या भोवऱ्यात- न पा प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष!

0

पाचोरा- शहरातील श्री गो से हायस्कूल मागील श्री रामनारायण थेपडे नगर म्हणजे एकेकाळी काही व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली सोसायटी होती कालांतराने सदरची सोसायटी अकार्यक्षम झाली. त्यामुळे यासोसायटीचे काम काज ठप्पच झाले. म्हणुन जवळ जवळ ही सोसायटी संपुष्टातच आली

यामुळे अनेकांनी या सोसायटीत असलेले बहुतांश प्लॉट-घरे सोसा. च्या कोणत्याही नियम अटीचे पालन करणे बंधन कारक नसल्याने विक्री - खरेदी केलीत तर काहीनी चुकीचे मोजमाप करून घराचे बांधकाम केल्यामुळे कोर्ट-कचेरी देखील झाल्या आहे मी ध्येय न्युज संपादक संदीप महाजन यांना एवढा तंतोतंत अभ्यास व माहीती असण्यामागील म्हणजे माझे स्वतःचे प्लॉट या भागात होते & विशेषबाब म्हणजे संपुर्ण सोसायटीच्या दुर्लक्षित कामकाजामुळे अद्यापही अनेक व्यक्तीचे नांवाने थेपडे नगर मधील प्लॉट, त्याचे माप हे सिटी सर्वेच्या उतार्‍यावर आजही नाही त्यांचा स्वतंत्र उतारा नाही असो.

आता प्रश्न असा आहे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शहरातील बऱ्याच ठिकाणचे कॉलनी व सोसायटीचे खुले भुखंड विकसीत करण्यासाठी घेतले त्यापैकीच एक भुखंड म्हणजे पाचोरा शहरातील थेपडेनगर मधील खुला भुखंड परंतु या भुखंडाचे कामकाज विकसीत करण्यासाठी हाती घेताच यावर मालकी हक्क सांगत या भुखंडात एकेकाळी इतर प्लॉट उभारता बांधकामासाठी तात्पुरता स्वरुपाची रूम नंतर शैक्षणिक क्लासेस करीता भाडयाने देणे सुरु होते त्याचे येणारे भाडे कोणाकडे & कशासाठी जमा होत होते & त्याचा खर्च काय झाला हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे नंतर ती रुम मोडकळीस आल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील शिकवण्या बंद झाल्यात त्यामुळे ती मोडकळीस आलेली रूम तशीच होती आज जेव्हा सदरचा भुखंड विकसित करण्याचे काम हाती घेतले तेव्हा भुखंडाच्या जागेत उभारलेल्या रूमवर मालकी हक्क सांगत वाद निर्माण झाला आहे. पाचोरा शहरात भुखंडाच्या जागी विना परवानगी खाजगी इमारत उभी करून त्याच्यावर मालिका हक्क सांगत वाद निर्माण करणे व परिसरातील शांतता धोक्यात आणण्याची ही पहीलीच वेळ आहे आता बघुया पाचोरा न पा प्रशासन परिसरातील जनतेच्या की खाजगी व्यक्तीच्या बाजुने न्याय देते सत्याच्या की? असत्याच्या
शेवटी कायदा श्रेष्ट आहेच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here