Breaking

21 वर्षांची परंपरा कायम ठेवत शिवनेरी ना. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

0

पाचोरा- येथील शिवनेरी नागरी पतसंस्था गेल्या 21 वर्षां पूर्वी स्थापन झाली आजही ती पतसंस्था सुरळीत चालू असून संचालक व सभासद यांच्या एकमताने आजही नफा मध्ये आहे 21 वर्षाच्या कार्यकाळात अनेक चेअरमन व संचालक त्यांच्यात बदल झाला पण कधीही या बँकेत निवडणूक न होता खेळीमेळीच्या वातावरणात बिन विरोध होत आहे ह्या बँकेबद्दल सभासदांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असता शेतकरी सभासद यांच्यासाठी शासनाच्या असलेल्या योजनेचे फायदे करून देतात तसेच शेतकर्‍यांसाठी शेतीसाठी लागणारे अवजारे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतात तसेच सभासदांना
जास्तीत जास्त डिव्हिडंड देतात या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षाला संचालकां मधून चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडून सर्वांना पाच वर्षात संधी दिली जाते त्यामुळे या बँकेत खेळीमेळीचे वातावरण आहे प्रत्येक संचालक हा बँक ही आपली नसून सभासदाची आहे त्याकरिता ते बँकेमध्ये ठेवी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतात व बँकेची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतात यासाठी सर्व संचालकांचे एकमत असते आज रोजी पुन्हा नवीन चेअरमन पदी श्री प्रकाश शामराव पाटील व व्हाईस चेअरमन पदी सौ सरला गोकुळ पाटील यांची निवड करण्यात आली तसेच नवीन निवड झालेले संचालक यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला यावेळी माजी चेअरमन डॉक्टर भरत लाला पाटील श्री दत्तात्रेय वामन पाटील श्री राजेंद्र दयाराम भोसले श्री विकास संतोष पाटील श्री गणेश भीमराव पाटील श्री राहुल शिवाजीराव भोसले श्री जगन्नाथ सहादु निकम श्री दिलीप सांडू धनराळे सौ स्वाती साहेबराव पाटील हे संचालक उपस्थित होते शिवनेरी नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री शांताराम विठ्ठल पाटील सहकार अधिकारी सहाय्यक निबंध सहकारी संस्था पाचोरा यांनी काम पाहिले तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पतसंस्थेचे मॅनेजर श्री मधुकर शंकर अहिरे यांनी काम पाहिले तसेच पतसंस्थेचे कर्मचारी श्री घनश्याम बारकू पाटील सौ शर्मिला साहेबराव पाटील व संस्थेचे सभासद श्री डॉक्टर जीवन साहेबराव पाटील श्री गोकुळ विष्णू पाटील श्री सुनील रामलाल पाटील हे सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here