Breaking

गर्व अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर- त्यांच्याच शब्दातील काही अनुभव

0

पाचोरा – तालुक्यातील वाडी- शेवाळे येथील मुळ रहिवाशी प्रगतीशिल शेतकरी वनश्री पुरस्कार प्राप्त श्री डिगंबर नथ्थु पाटील सर्वाचे डिगाबाबा त्याचे सुपूत्र व नगरदेवळा येथील श्री एस.के.पवार माध्य. शाळेतील उपशिक्षक & गर्वाने संगावेशे असे माझे किर्तिवंत- गुणवंत विद्यार्थी प्रसिद्ध व्याख्येते श्री सचिन देवरे सर यांनी आज काही निवडक अनुभव आपल्या शब्दात मांडले ते खास ध्येय न्युज वाचकांसाठी प्रसारित करीत आहे🙏 १➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚩महाराष्ट्रातले किल्ले जिंकणे कठीण आणि मराठी माणसांची मने जिंकणे त्याहून कठीण…🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‼️प्रसंग 1 – दुंधे ता. मालेगाव जि. नाशिक येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र वरील व्याख्यानासाठी 🎤गेलो असताना व्याख्यानानंतर रात्री सुमारे 10 वाजता युवा शेतकरी तुषार रौंदळ याने थांबवून आग्रहाने गोणी भरून कांदे 🫐भेट दिले…
▪️▪️▪️▪️▪️▪️
‼️प्रसंग 2 – तेथून पुढे काही अंतर गेलो तोच युवा शेतकरी मुन्ना रौंदळ, दादाभाऊ रौंदळ याने स्वतःच्या शेतातील काही 🍉टरबूज 🍉आणले आणी प्रेमळ आग्रहाने भेट दिले..
▪️▪️▪️▪️▪️▪️
‼️प्रसंग 3 – जामनेर येथे व्याख्यान 🎤ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहून रामकृष्ण मठ ,(पुणे) च्या स्वयंसेवकांनी तिथे पुस्तकांचा📚 स्टॉल लावला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम त्यांनी ऐकला.. माझे व्याख्यान संपल्यानंतर यापैकी दोन✌️ स्वयंसेवक आवर्जून भेटले.त्यांनी सांगितले की.. “सर तुमचे व्याख्यान ऐकून इकडे आमचे डोळे👁️ पाणावले…तुमचे व्याख्यान ऐकणे म्हणजे खरोखर स्वर्गीय💖 अनुभव होता..” आणि भारावलेल्या त्या ज्येष्ठांनी “अग्नी मंत्र” ,”वैदिक गणित”, आणि “एक गोष्ट सांगतो” असे तीन पुस्तके 📚भेट दिलीत….
▪️▪️▪️▪️▪️▪️
‼️प्रसंग 4 – कारगावं ता. भिवापूर जि.नागपूर येथे व्याख्यान 🎤झाल्या नंतर रात्री यजमान कपिल गहुकर यांच्या घरी जेवणासाठी थांबलो असताना… करण नक्षिने, वैभव खाटीक, मयुर राऊत, प्रणय मगर, राकेश गिरडकर आदी 8वी ते 10 वी चे विद्यार्थी भेटण्यासाठी आले..व्याख्यान 🎤खूप छान झाले..आवडले..असे म्हणून त्यांनी एक बंद पाकीट 🧧पुढे केले…त्यात काय आहे❓ असे विचारले असता.कळाले की स्वयं स्पूर्तीने त्यांनी काही पैसे💰 जमा करून आणले आहेत..फार तर 500-700 रू त्यात असतील..पण शिव🚩 चरित्रावर इतकं छान बोलणाऱ्या या तरुणाला आपण गावाची आठवण म्हणून काहीतरी दिलं पाहिजे🎁 अश्या निरागस भावनेने त्यांनी हे पैसे💰 जमा करून आणले होते…या पैशात तुम्ही पुस्तके📚 विकत घ्या…किंवा अश्याच एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी तो खर्च करा असे सांगून…त्यांचे पैसे💰 त्यांना परत केले..( दुर्दैवाने हा फोटो काढण्याचे राहून गेले)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🚨मित्रांनो… 🚩छ.शिवराय, राजे संभाजी, 🚩हिंदूसूर्य महाराणा प्रताप, 🚩क्रांतिसूर्य महात्मा फुले, 🚩भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , 🚩पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांच्या जीवन चरित्रावरील जवळ जवळ प्रत्येक व्याख्यानानंतर🎙️ असे प्रेमळ क्षण अनुभवायला येतात…
▪️▪️▪️▪️▪️▪️
⭕सर तुम्हाला काय आवडत.. ❓ असे व्याख्यानाच्या 3-4 दिवसापूर्वीच विचारून .. आत्यंतिक आग्रहाने घरी जेवायला 🍱घेऊन जाणारे प्रा.सागर रौंदळ असो की… 💰पैसे,पुस्तके📚,विविध भेटवस्तू🎁, खाद्यपदार्थ खूप आग्रहाने देणारे सर्वच वयोगटातील व्यक्ती असोत… ❣️खूप प्रेम महाराष्ट्रातून मिळतंय..
▪️ ▪️▪️▪️▪️▪️▪️
🎪मित्रहो…कांदे,फळे,🍉आणि पुस्तके 📚यांची बाजारातील किंमत काढता येईलही…पण प्रेमाने….ज्या भावनेने या भेटवस्तू 🎁दिल्या जातात त्यांची पैशात किंमत 💰करणे निव्वळ अशक्य…

🤔एखाद्याला वाटेल..सर तुम्ही खूप लोकप्रिय💤 आहात म्हणून हे सारे घडतेय… परंतु खरे सांगू..लोक माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर प्रेम💖 करत नाहीत…मी ज्या 🚩महापुरुषांचे विचार सांगत असतो त्या 🚩महापुरुषांच्या प्रेमापोटी ते हे सारं करत असतात.. त्यांचे प्रेम असते त्या आभाळा एवढ्या महापुरुषांवर… मी फक्त निमित्तमात्र असतो..

🍫मी केलेल्या कणभर कार्यावर महाराष्ट्राने मणभर प्रेम ❣️केलं…माझ्या अभ्यासपूर्ण ✒️आणि दर्जेदार अश्या व्याख्यानातून🎤 हे प्रेम मला कायम मिळत राहील असाच माझा प्रयत्न असेन….

🚩मराठी माणसांची मने जिंकता आली हेच माझे भाग्य
➖➖➖➖➖➖➖➖
🙏आपला नम्र – शिवराणा व्याख्याते ❗सचिन देवरे सर❗ पाचोरा मो.9226574867

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here