Breaking

Dhyeya News वि.का.सोसा.चेअरमनपदी प्रल्हादभाऊ तर
व्हा.चेअरमनपदी युवराजआण्णा पाटील

पाचोरा-तालुक्यातील बोटावर मोजण्या एवढ्या वि.का.सोसायटी यांचे नाव प्रगती व सभासदांची जिव्हाळ्याची असणारी संस्था म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये प्रल्हादभाऊ रामदास पाटील यांचे एकछत्र नेतृत्व असलेल्या पाचोरा तालुक्यातील भाऊसो.रामदास पाटील विविध कार्यकारी सेवा सोसा.मर्या.,पुनगाव हिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

विशेष बाब म्हणजे या वि.का.सोसायटीची एखाद-दोन वेळेची निवडणूक सोडली तर या संस्थेची निवडणूक सोसायटीचे सभासद, हितचिंतक, पुनगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीकांच्या सहकार्यामुळे सहकार क्षेत्रात राजकारण नको हे तत्व अवलंबत बिनविरोध झाली आहे. यावर्षी सन 2022 ची निवडणूक देखिल अशाच प्रकारे बिनविरोध होवून परंपरा कायम ठेवली. यात प्रल्हाद रामदास पाटील, प्रल्हाद गुजर, अनिल महाजन, कैलास मराठे, दिपक परदेशी, बाजीराव पाटील, सिताराम पाटील, युवराज पाटील, राजाबाई परदेशी, वर्षा पाटील, संजय निंबाळकर, संजय सोनवणे, प्रकाश परदेशी, शंकर रूपचंद्र हे मान्यवर सदस्य बिनविरोध घोषीत झाले. अशा या प्रगतीशील सोसायटीची नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा नुकतीच सिताराम पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.ए.देशमुख संपन्न होवून चेअरमन पदासाठी प्रल्हाद पाटील तर व्हा.चेअरमन पदासाठी युवराज पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व बिनविरोध विजयी झालेल्या चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.सभागृहाचे राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते संजयनाना वाघ यांनी अभिनंदन केले. सर्व निवडणूकीचे कामकाज यशस्वी व पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव सुनिल पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ व संस्थेचे हितचिंतकांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here