Breaking

20 रोजी फिरते लोकन्यायालय

0

पाचोरा-तालुक्यातील वेरुळी खुर्द येथे ता 20 जून रोजी फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून हे फिरते लोकन्यायालय
उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात मोबाईल लोक अदालत वॅन (फिरते लोकन्यायालय) येणार असून ता 9 ते 22 जून दरम्यान जिल्ह्यातील 14 तालुक्यात हे फिरते लोकन्यायालय उपस्थिती देणार आहे.

https://youtu.be/geJFzpkvZVM

ध्येय न्युजच्या वरील ब्लु लिंकला टच करा & पहा बीएस्सी अँग्रीकल्चर व अँग्रीकल्चर च्या इतर विविध शाखांमधील प्रवेशाची प्रक्रिया वरील मार्गदर्शन

पाचोरा तालुक्यात ता 20 रोजी वेरुळी खुर्द येथे येणाऱ्या फिरत्या लोकन्यायालय आयोजना संदर्भात झालेल्या बैठकीस तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर ,न्या. एल व्ही श्रीखंडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ऍड प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ऍड चंदनसिंग राजपूत, सचिव ऍड राजेंद्र पाटील, ऍड एस पी पाटील, विस्तार अधिकारी सुरवाडे, ग्रामसेवक शरद पाटील आदी उपस्थित होते.


या बैठकीत फिरत्या लोकन्यायालया संदर्भात आयोजन करण्यात आले. यात नियमित दिवाणी दावे, दरखास्त, संक्षिप्त फौजदारी खटले ,धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे, प्रलंबित खटले, दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे खटले, तसेच राष्ट्रीयकृत बँका, दूरध्वनी ,वीज कार्यालय, ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी याबाबतची प्रकरणे, थकित रक्कम सूट , वसुली यासंदर्भातील दावे ठेवून तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. या फिरत्या लोकन्यायालयात दावे ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधावा यात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन न्या. जी बी औंधकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here