पाचोरा-शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातुन व शहरातील कॉलनी परिसरातुन विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन मोठया प्रमाणावर कार्यान्वीत आहे. शासनाने नुकतेच विद्यार्थी- स्पेशली विद्यार्थीनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वपुर्ण नियमावली निश्चित केली आहे.
पाचोरा शहरात स्पेशली खडकदेवळा येथुन विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन बघीतले तर सर्व नियम अटी धाब्यावर बसवुन सर्रास वाहतुक करण्यास समाधान मानत आहे विशेषबाब म्हणजे सध्या एका बाजुला मुलींच्या सुरक्षेसाठी जन जागृती करुन गुडटच- बॅडटच सारखे प्रबोधन करणारे व्याख्यान आयोजीत करून जन- जागृती केली जात आहे.
परंतु या वाहनात बघितले तर अक्षरक्ष: गुरांप्रमाणे विद्यार्थ्यांना कोंबुन विद्यार्थी वाहतुक करतांना दिसतात काही वाहने RTO परवाना प्राप्त नाहीत जी आहेत ते RTO & विद्यार्थी वाहतुकीची सर्व नियम धाब्यावर बसुन विद्यार्थी वाहतुक करतांना खुलेआम दिसत आहे. शिवाय काही वाहन धारक विद्यार्थी वाहतुक करत असतांना विशिष्ट शाळा व शिक्षकांचे एजंट म्हणुन जाबादारी पार पाडतांना दिसतात असे चित्र प्रामुख्याने खडकदेवळा पाचोरा चालणार्या वाहनांबाबत जास्त प्रमाणावर दिसत आहे.
तरी मा. जळगाव जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब,RTO विभागयांनी आपल्या स्तरावर समन्वय समीती स्थापन करून जिल्हा व तालुका स्तरावर तपासणीसह कारवाई करणारी यंत्रणा कार्यान्वीत करणे गरजे आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3