Breaking

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळा(स्मारक) नियोजित जागेवरच होणार!! उपोषण कर्त्याच्या मागणीला यश

0


पाचोरा- गेल्या २०ते२५ वर्षापासून प्रलंबीत असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याच्या मुद्यावरुन पाचोरा शहरात २० तारखेपासून राष्ट्रीय ओ.बी.सी.मोर्चासमता सैनिक दल आणि पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी , राजकीय, सामाजिक, सहयोगी संघटनेच्या वतीने उपोषणाचा पवित्रा हाती घेतला होता. त्याची प्रमुख जबादारी राष्ट्रीय ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष १)सुनिल दादा शिंदे २) माजी नगरसेवक वासुदेव महाजन(वासूअण्णा महाजन) ३) माजी नगरसेवक अशोक मोरे ४) समता सैनिक दलाचे जि.उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते किशोर डोंगरे ह्या मान्यवरांनी हाती घेतली होती. उपोषणाची तीव्रता वाढू लागल्याचे लक्षात येताच पाचोरा शहराचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी दखल घेत आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून उपोषणची सांगता करावी असे सुचवले. उपोषण स्थळी पी.टी.सी.चे चेअरमन व नगर पालिकेचे माजी गटनेते सन्माननीय संजय नाना वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहिल, उप.नगराध्यक्ष शरद भाऊ पाटे अदि मान्यवरांनी दखल घेत प्रशासन व उपोषण कर्ताची भूमिका व मागणी लक्षात घेता शेवटी न.पा.प्रशासनाने नम्रतेची भूमिका घेत सर्व मागणी मजूर करत उपोषण मागे घ्यावे व पुतळा(स्मारक) संदर्भात एन.ओ.सी.,ठराव,जागेचा उतारा, पी.डब्लू.डी.ला दिलेल्या इस्टीमेटसाठीचे पत्र इत्यादी महत्त्वचे कागदपत्रे देत व उपस्थित मान्यवरांच्या मध्यस्तीने उपोषणची सांगता करण्यात आली.

सदर उपोषण सोडविण्यासाठी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. पी.टी.सी.चे चेअरमन व नगर पालिकेचे माजी गटनेते मा.नानासाहेब संजय वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.संजय नाथालाल गोहिल, उप.नगराध्यक्ष मा.शरदभाऊ पाटे, न.पा.मुख्यकार्यकारी शोभाताई बाविस्कर मॅडम, प्रशासकीय अधिकारी भोसले आप्पा, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील साहेब, माजी नगसेवक गणेश पाटील, नानासाहेब देवरे, हरुन भाई देशमुख, बशीर दादा बागवान,हरीभाऊ पाटील,अॅड.अण्णासाहेब भोईटे,भरत भाऊ खंडेवाल,नंदूभाऊ सोनार, नितीनभाऊ संघवी, पप्पू राजपुत, दिपकभाई अदिवाल,अझहर मोतीवाला, मतीन बागवान, योगेश महाजन, मछिद्र जाधव, विलास पाटील सर बामसेफ, माजी नगरसेवक विकास पाटील सर, किशोर बारवकर, भालचंद्र ब्राम्हणे, खंडू सोनवणे,शशी मोरे,सतीष देशमुख सर,बागुल काका, नंदलाल आगारे आदि मान्यवर उपस्थित होते

सदर उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या संघटना व कार्यकर्ते व नेत्यांचे आभार किशोर डोंगरे यांनी मानले व सर्वानूमते उपोषण संपले असे जाहीर केले. या उपोषणाला समता परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिवस्वराज्य युवा फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक काँग्रेस, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,पी.आर.पी. व इतर अनेक सामाजिक राजकीय संघटनांचा पाठिंबा होता. सर्व पत्रकार बांधवांनी ही अनमोल असे सहकार्य केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष सुनील दादा शिंदे यांनी देखील आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here