Breaking

भडगावात मेन रोड वर भरणारा आठवडे बाजार व डेली बाजाराचा प्रश्न सुटणार कधी? नगरपालिका कारवाई करणार की भर रस्त्यातच बाजार भरणार..

0

भडगाव – शहरात जुन्या गावात जाण्यासाठी एकमेव असा मेन रोड हा अगोदर अरुंद असल्याने त्यावर दुभाजक टाकून रुंद करण्यासाठी नगरपालिकेने मागील वर्षी अतिक्रमण काढले व व्यापाऱ्यांनी नगरपरिषद ला सहकार्य करत स्वतःहून ते काढले. यानंतर रस्ता हा मोठा झाला त्यावर दुभाजक टाकले परंतु हा रस्ता आता लोटगाडी, हातगाडी, भाजीपाला विक्रेते यांनी काबीज केला असून हा रस्ता लोटगाडी धारकांनी खरेदी केला का ? यावर नगरपालिका प्रशासन कारवाई करेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरात जाणारा एकमेव मुख्य रस्ता मेन रोड हा अगोदर अरुंद होता यावर वर्दळ वाढल्याने नगरपालिके तर्फे मागील वर्षी अतिक्रमण काढून मेन रोड हा रुंद करत दुपदरी करण्यात आला व यामध्ये दुभाजक टाकले. हे दुभाजक येण्या जाण्यासाठी दुचाकी, चारचाकी, बैलगाडी, पायदळ, जाण्यासाठी अडचण ठरू नये व वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी टाकण्यात आले.

परंतु काही महिन्यांपासून या मेन रोडच्या दुभाजकाच्या खेटून दोन्ही बाजूला रस्त्याच्या मधोमध भाजीपाला विक्री करणाऱ्या लोटगाद्या, हातगाड्या, यांनी मेन रोड काबीज केला असून जसे काही रस्त्या खरेदी केला आहे. या प्रमाणे लावतात. तसेच दुभाजका वरील काळा व पिवळा रंगाच्या पट्ट्या रंगवलेल्या आहेत त्या पट्ट्या मोजून इथपर्यंत जागा माझी आहे. व मी याठिकाणी दुकान लावतो. ही जागा माझी आहे. .

अश्या पद्धतीने भर मेन रोडवर दुकान लावून रस्ता काबीज केला आहे. यामुळे नाहक व्यापारी व नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून मेन रोड मोकळा श्वास केव्हा घेईन, यावर नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी-विक्रम बांदल, मुख्याधिकारी- रवींद्र लांडे हे कारवाई करणार का? पथक नेमण्यात का? रस्त्यावरील लोटगाडीचा प्रश्न कायमचा मिटेल का? की जैसे थे तसेच राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शुक्रवारचे नगरपालिका पथक व ट्रॅक्टर गायब !

भडगावचा आठवडे बाजार हा शुक्रवारी भरतो.हा बाजार नगरपालिकेने हनुमान मंदिर ते लाडकुबाई शाळा रस्ता, टोंनगाव रस्ता या ठिकाणी दुकानाची आखणी करून भरायचा व मेन रोडवर कुठलेही हातगाड्या, भाजीपाला दुकान न लावता त्या ठिकाणी भरायचा यासाठी नगरपालिकेने एक पथक व त्यासोबत ट्रॅक्टर नेमले असता रस्त्यात एकही दुकान लागत नव्हते. परंतु काही दिवसापासून नगरपालिकेचे पथक व ट्रॅक्टर गायब झाल्याने शुक्रवारचा बाजार व दररोज लागणाऱ्या गाड्या ह्या भर रस्त्यात लागत असून. यावर नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी व रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here