Breaking

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांना रेनकोट – छत्री वाटपाचे आयोजन

0

पाचोरा-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खान्देश विभागातर्फे पाचोरा येथे दिनांक 29 जुलै रोजी पत्रकारांना संघटनेमार्फत मोफत रेनकोट व छत्री वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.
पत्रकारांना सोबत घेऊन संघटित पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार यावर लढा देण्यासाठी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना नेहमीच तत्पर असते. राज्य पत्रकार संघाचे 40 हजार सभासद असलेली एकमेव संघटना आतापर्यंत सर्वात जास्त सभासद संख्या असलेली संघटना म्हणून कमी दिवसात या संघटनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. वेळोवेळी समाजाभिमुख कार्यक्रम घेत एक नवी भरारी या संघटनेने घेतली आहे या संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप पत्रकारांना हेल्मेट वाटप पत्रकारांचा विमा काढणे असे विविध

कार्यक्रम या संघटनेने आजपर्यंत घेतलेले आहेत या संघटनेमार्फत खान्देश विभागात पाचोरा भडगाव चाळीसगाव व पारोळा या चार तालुक्यातील पत्रकारांना पाचोरा येथे दिनांक 29 जुलै शुक्रवार रोजी शक्ती धाम मंगल कार्यालय भडगाव रोड पाचोरा येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे ,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या सह पत्रकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक

अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल, कैलास चावडे तहसीलदार पाचोरा, मुकेश हिवाळे भडगाव तहसीलदार, अमोल मोरे चाळीसगाव तहसीलदार, किसनराव नजन पाटील पो निरीक्षक पाचोरा , अशोक उतेकर पो निरीक्षक भडगाव, प्रताप इंगळे पो निरीक्षक पहूर, के .के. पाटील पो निरीक्षक चाळीसगाव,संजय ठेंगे पो निरीक्षक चाळीसगाव ग्रामिण, भागवत पाटील पो निरीक्षक नॅशनल हायवे चाळीसगाव तुषार देवरे पो निरीक्षक वाहतूक शाखा चाळीसगाव , विष्णू आव्हाळ पो निरीक्षक मेहूनबारे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत .या कार्यक्रमाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन संघटनेचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी, भडगाव तालुका अध्यक्ष गणेश रावळ, पारोळा तालुका अध्यक्ष ,बाळू पाटील , चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here