Breaking

योग्य उपचार करून नवीन जीवनदान दिल्याबद्दल रुग्णाच्या परिवाराच्यावतीने देवतारूपी वैद्यकीय टीमचे सत्कार करून मानले आभार

0

पाचोरा- 23 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील रहिवाशी सोहेल शेख गाढ झोपेत असतांना त्यास अती विषारी जातीच्या मण्यार ह्या सर्पाने चावा घेतला सदरचा साप हा अति विषारी असल्यामुळे सोहेल शेख याच्या अंगात झपाट्याने वीष चढायला सुरुवात परिणामतः रुग्णाची अवस्था गंभीर गंभीर झाली तशाही अत्याअवस्थेत रुग्णाच्या नातेवाईकांनी पाचोरा येथील डॉ.स्वप्नील पाटील & डॉ. ग्रिष्मा पाटील यांच्या पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला आणले असता सदर तरुण हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे वं त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची परीस्थिती चिंताजन होती तातडीने रुग्णावर उपचार सुरु करून व्हेंटिलेटरसह सर्पदंशाची ट्रीटमेंट सुरु करून रुग्णाचे प्राण वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. डॉ स्वप्निल पाटील दादा आणि त्यांच्या हॉस्पिटल टीम ने आपल्या ट्रीटमेंट आणि अनुभवाच्या जोरावर सोहेल ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. 5 दिवस हा तरुण व्हेंटिलेटर वर होता व दरम्यान 2 वेळा हृदय बंद पडल्यामुळे त्याला CPR देण्यात आला.अखेर सिद्धीविनायक हॉस्पीटलची टीमचे प्रयत्न व तरुणाच्या स्नेहींची परमेश्वर चरणी प्रार्थना अशा दवा & दुवा संगमाने रुग्णाचे प्राण वाचवण्यास यश मिळाले सदरचा रुग्ण पुर्वस्थितीत आल्यानंतर सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मधून त्याची सुट्टी देण्यात आली. त्यावेळेस सोहेल च्या कुटुंबियांनी डॉ स्वप्निल पाटील& डॉ.सौ.ग्रिष्मा पाटीलसह हॉस्पिटल स्टाफ ने सोहेल ला योग्य उपचार करून नवीन जीवनदान दिल्याबद्दल सोहेलच्या परीवाराच्या वतीने सत्कार करून आभार मानले. यावेळेस सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बालरोगतज्ञ डॉ ग्रिष्मा पाटील, बनोटी येथील डॉ अजित पाटील व रहीम बागवान यांची उपस्थिती होती.
सर्पदंश व पॉयझन घेतलेल्या रुग्णांवर डॉ स्वप्निल दादा नेहमीच यशस्वी उपचार करतात व हॉस्पिटल मधून मागील 3 महिन्यात असे अति गंभीर 15-20 रुग्णांची योग्य ट्रीटमेंट करून दादांनी त्यांना जीवनदान दिले आहे. त्याबद्दल दादा व पूर्ण हॉस्पिटल स्टाफ यांचे मनापासून अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here