Breaking

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बालकांसाठी मोफत मेडीकल चेकअप सप्ताह

0

पाचोरा-बालकांसंदर्भात सद्यस्थितीत विविध संसर्गजन्य आजार लक्षात घेता त्यासाठी करावयाची काळजी व तपासणी दिनांक 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान पाचोरा शहरातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 पावेतो बालकांसाठी वय वर्ष नवजात ते 12 वर्ष वयोगटापर्यंत मोफत मेडीकल चेकअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहिक शिबीराचे वैशिष्ट – लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, मोफत रक्ततपासणी, मोफत एक्स-रे, सर्व लसीकरणसंदर्भात मोफत मार्गदर्शन, आहाराविषयी मोफत सल्ला, गरजू बालकास मोफत वाफ सुविधा अशा विविध विनामुल्य तपासणी

याशिबीराअंतर्गत करण्यात येणार असल्याचे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक बालरोग व नवजात शिशूतज्ञ डॉ.ग्रिष्मा स्वप्निल पाटील (एम.बी.बी.एस.,डी.सी.एच.) यांनी ध्येय न्यूजशी बोलतांना सांगितले. तरी गरजूंनी आपली नाव नोंदणी मोबाईल क्र.9172523698 / 7175308563 या क्रमांकावर करावी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here