Home Blog Page 2
Breaking

सक्तीची बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- अमोलभाऊ शिंदे

0

पाचोरा-येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात जाऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची ऐन रब्बी हंगामात सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी या संदर्भात निवेदन देऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.


यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात खरीप हंगामात पिके शेवटच्या टप्प्यात असताना उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरात येण्याच्या वेळी (म्हणजेच कापूस पिकात बोंड परिपक्व होत असतांना आणि ज्वारी मका पिकाचे कणीस भरत असताना) झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अशा बिकट परिस्थितीत या सरकारने बाधित क्षेत्र जिरायती/बागायती/बहुवार्षिक अश्या सर्व शेतकऱ्यांना वेगवेगळी मदत घोषित करून तशी न देता सरसकट १०,००० प्रति हेक्टर याप्रमाणे तुटपुंज्या स्वरूपाची मदत दिली.

या दुष्काळी मदतीत शेतकऱ्यांचा एकरी लागणारा मशागतीचा,बी-बियाणे व रासायनिक खतांचा आणि मजुरीचा देखील खर्च निघाला नाही.अशा पद्धतीची दुष्काळी मदत करून ह्या असंवेदनशील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली.
परंतु आता शेतकरी बांधव आधीच्या संकटातून सावरत नाही तोपर्यंत रब्बी हंगामाची सुरुवात झाली असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांमध्ये मका,गहू,हरभरा,सोयाबीन,
बाजरी या पिकांची लागवड केलेली आहे. काही शेतकरी लागवडीसाठी शेतीला पाणी देऊन क्षेत्र लागवडीयोग्य करीत आहेत.

या काळात शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना हे अकार्यक्षम ठाकरे सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीचे वीज बिल वसुली करून वीज बिल न भरल्यास कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा जुलमी प्रकार सबंध पाचोरा आणि भडगाव तालुक्यात करीत आहे. असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.तसेच त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर देखील घणाघाती टीका करत म्हणाले की आमदार अजून झोपेत असून त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या का दिसत नाहीत.गेल्या काही दिवसांपासून रोज शेतकरी भाजपा कार्यलयात येतात व समस्या मांडतात फोनवर संपर्क करून समस्या मांडतात मात्र आमदार महोदयांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का ? असा सवाल करत शेतकऱ्यांचे विहिरीत पाणी असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याची जहरी टीका यावेळी शिंदे यांनी आमदारांवर करत महावितरणाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांना निवेदन देऊन सदर सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणे न थांबल्यास रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा दिला

याप्रसंगी उपस्थित पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस संजय पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.

आघाडी सरकारचे दरमहा टार्गेट पूर्ण करावे लागत असल्याने पोलीस प्रशासनातील कनिष्ठां पासुन तर वरिष्ठां पर्यंत सर्वच एकमेकांची चुप्पी ठेवत कामकाज चालत आहे (सदरची महीला काय म्हणाली पहा VDO)

0

पाचोरा (प्रतिनीधी)—तालुक्यातिल सारोळा खु।। येथिल ५० वर्षिय शेतिव्यवसाय करणार्‍या रंजनाबाई रमेश पाटील ही महीला कुटूंबावर, शेती व पाळीव जनावरांवर जादु टोना करते, करणी करते, भानामती करुन त्यांचे पिकांचे व उत्पन्नाचे नुकसान करते असा आरोप करीत मला व माझ्या पति व मुलांना शिवीगाळ करणे, टोमणे मारुन अपमान करणे,
घरासमोर लिंबु वगैरे कापुन टाकणे असे मानसिक त्रास देत असुन तिच्या या कृत्यातुन त्यांची गर्भवती असलेली गाय मरण पावली म्हणुन अंगावरिल ओल्या वस्ञांनी गावातिल मारोती मंदिरावर पाणी टाकुन दोषी नाही हे सिध्द करायला लावणार्‍या नातेवाईंकांच्या या ञासाला कंटाळुन पाचोरा पोलिसात धाव घेतली असता पाचोरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेउन महाराष्ट अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवता फक्त अदखलपाञ गुन्हा नोंद करून घेत न्यायालयात जाउन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.विशेषतः या घटनेत गावचे पोलिस पाटिल हे साक्षिदार असतांनाही हा तुघतकी सल्ला देणार्‍या पोलिस स्टेशनमध्ये कायद्याचे राज्य आहे कु नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदरची महीला काय म्हणाली पहा VDO

याप्रकरणी रजनाबाई पाटिल यांनी पाचोरा पोलिसांना तक्रारी अर्ज दिला असुन त्यात नमुद करण्यात आले आहे की,त्या त्यांच्या पति,मुलगा व सुन सह सारोळा खु।। येथे राहतात. त्यांचे नातेवाईक देविदास धोंडू पाटील,मंगलाबाई देविदास पाटील,अनिल देविदास पाटील, मयुरी अनिल पाटील, गणेश देविदास पाटील, ज्योती देविदास पाटील व विलास शिंदे हे प्रचंड अंधश्रध्दा पाळणारे आहेत.मला व माझ्या कुटूंबाला कायम विनाकारण त्रास देत आहेत. वरील आरोपींनी माझ्यावर, मी त्यांच्या कुटूंबावर, शेती व पाळीव जनावरांवर जादु टोना करते, करणी करते, भानामती करुन त्यांचे पिकांचे व उत्पन्नाचे नुकसान करते असा आरोप करीत मला व माझ्या पति व मुलांना शिवीगाळ करणे, टोमणे मारुन अपमान करणे,
घरासमोर लिंबु वगैरे कापुन टाकणे असे मानसिक त्रास देणे चार वर्षांपासुन सुरु होते.

सुमारे ६ महीन्यांपुर्वी अनिल याचे मयूरी हिचेशी लग्न झाले.दोन महिन्यापासुन मयुरी पाटील हिचे अंगात माझा प्रवेश झालाआहे व मी त्याद्वारे आरोपींच्या कुटुंबीयांना त्रास देत असुन करणी,भानामती करुन तीला त्रास देते.तीच्या अंगात येते, ती सर्व कुटूंबाचे नावे सांगुन त्यांचा सुड घेणार आहे असे मी अंगात येवुन सांगते असा माझ्यावर आरोप करुन मला व माझ्या कुटूंबाला त्रास देणे सुरु केले. त्यानंतर २४ नोहेंबर रोजी गरोदर गाईला मृत्यु आला. तेव्हा अनिल यांचे सासरे विलास शिंदे यांनी खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मला लाज वाटत होती इतक्या खालच्या स्तरावरुन शिवीगाळ केली.तेव्हा गावातील माजी सरपंच शिवदास पाटील यांनी त्यांची समजुत
घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही ऐक ऐकले नाही व मारहाण सुरू केली आम्ही जीव वाचवण्यासाठी ओरडलो तेव्हा
शेजारी व गावचे पोलीस पाटील यांनी मला व माझ्या पतीला वाचवले. गावकर्‍यांनी याबाबत पुरावा मागीतला
असता डोंगरगावचा शंकर कोळी आणि घाटावरचा भगत यांच्याकडुन आम्हाला माहीती मिळाल्याचे समंधित सांगतात
त्यानंतर त्यांनी मला सांगीतले की तु जर आमच्या सुनेवर करणी केली नसेल तर तुला ओल्या वस्त्रानिशी गावच्या मारुतीच्या मंदीरात येवुन देवावर पाणी टाकावे लागेल. मला व माझ्या कुटूंबाला मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले तर यापुढे ते त्रास देणार नाहीत व आरोपही करणार नाही


असेही त्यांनी सांगीतले. या प्रसंगी गावातील शिवदास पाटील, रविंद्र मधुकर पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ युवराज अहीरे, तसेच धनराज महादु इजारे हे हजर होते. त्यांनीच आमचे कुटूंबाची या सर्व घटनेतुन सुटका केली. आमच्या जिवाच्या भितीमुळे मी त्यांचे सांगण्याप्रमाणे गावातील मारुती
मंदीरावर ओल्या वस्त्रानिशी गेले व देवावर पाणी ओतले. तेव्हा आरोपींनी गावातुन माझी धिंड काढून माझा प्रचंड अपमान केला. तेव्हा अनिल यांने मला मारहाण देखील केली. तसेच वरील आरोपी रस्त्याने जातांनाही मला शिवीगाळ करीत होते हीला जीवे ठार मारा असे लोकांना प्रोत्साहन देत म्हणत होता. यावेळी गावातील व बाहेर गावचे भरपुर लोक होते
पण दहशतीमुळे मला वाचवायला कुणीही पुढे आले नाही. याप्रसंगी देखील रविंद्र मधुकर पाटील, पोलीस पाटील सिद्धार्थ युवराज अहीरे, तसेच धनराज महादु इजारे व मुरलीधर कोंडीबा भवर हे साक्षीदार हजर होते. त्यानंतर आज
सकाळी मला व माझ्या पतीला व मुलाला शिवीगाळ केली व माझ्या सुनेचे केस ओढून तीला मारहाण केली या सर्व घटनेने माझी प्रचंड आब्रु गेली असुन मला आता बाहेर जायची देखील लाज वाटते.तसेच गावातील लोक देखील वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघतात.

आमच्या कुटूंबाला अश्याप्रकारे
प्रचंड माणसिक त्रास देवुन , शिवीगाळ व मारहाण करुन तसेच जादुटोना, करणी सारखे बिनबुडाचे आरोप करुन तसेच मला ओल्या वस्त्रानिशी गावातुन धिंड काढुन मदीरातील मारुती देवाच्या अंगावर पाणी टाकण्यासारखे अघोरी कृत्य मला करायला लावले म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर
फिर्याद देत असल्याची तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिसात अदखलपाञ गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढिल तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल हे करित आहे. चार दिवसांपुर्वी अवैद्य रेती वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाच्या नावाने त्याच्याच चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्याची बिरबली शक्कल लढविणार्‍या पाचोरा पोलिसांनी आजच्या या तक्रारी अर्जाची शहानिशा न करता व महाराष्ट अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यानुसार गुन्हि न नोंदविता तक्रारदारास न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला

26/11/2021 रोजी सायंकाळी देखील असाच प्रकार घडला पाचोरा शहरातील नगर पालिका लागत एक परप्रांतीय भेळपुरीची गाडी लावुन आपल्या परिवाराचा उदर निर्वाह चालवितो त्याला देखील मारहाण करीत त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या मालाचे नुकसान केले व नेहमीच फुकटाचे खाऊन पुन्हा वरतुन पैशाची मागणीचा त्रास सहन न झाल्याने त्याने संबधीत परप्रांतीय सायंकाळच्या वेळी घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी गेला असता संबधित ठाणे अंमलदारने घडलेल्या घटनेची तक्रार तर घेतलीच नाही वरतुन पुन्हा त्यास तुझे तेल, कचोरी, समोसा, मालाची तपासणी करू असा सज्जड दम देखील दिला अखेर सदरची बाब पाचोरा पि आय किसन नजन पाटील यांच्या कानी पडताच त्या घटनेची दखल घेत संबधिताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र 395 सारखा गुन्हयाचा प्रकार असतांना देखील या प्रकाराचा साधा अदाखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला सदर प्रकारातील आरोपी अद्यापही खुलेआम फिरत आहे. किसन नजन पाटील साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांची गाव गुंडावरील दहशद आणि पोलीस प्रशासनावरील कामकाजाची पकड एक आदर्श होता परंतु आता
पाचोरा शहरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे, घरफोड्या, भुरटी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत अधिकार्‍यांपेक्षा विशेष पोलीसच पाचोरा पोलीस स्टेशनचा कारभार चालवत असल्याचे चित्र आहे. अर्थात पोलीसांचा ही काय? दोष आघाडी सरकारचे दरमहा टार्गेट पूर्ण करावे लागत असल्याने कनिष्ठां पासुन तर वरिष्ठां पर्यंत सर्वच एकमेकांची चुप्पी ठेवत कामकाज चालवत आहे

दुसऱ्या बाजुला पाचोरा शहरात धार्मीक झेंड्यावरून दंगल झाल्याची नोंद पाचोरा प्रशासनाच्या दप्तरी नोंद असतांना आता पुन्हा इले. पोलवर वेगवेगळ्या धर्माचे ध्वज लावल्याचे दिसत आहे

तसेच पाचोरा शहरात रोड रोमियो सह कर्ककश हॉर्न वाजवत भधाव दुचाकी वाहन चालवणार्‍यांची संख्या देखील वाढली आहे

त्यामुळे अशा गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याचा व कारवाई करण्याचा प्रश्नच नाही किंवा पुनश्च पाचोरा पोलिस प्रशासनाला कायद्याचे प्रशिक्षण देण्याची गरज तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचेही मुख्य कार्यालय असुन पाचोरा पोलिसांच्या या कारभाराची वरिष्ठ अधिकारी म्हणुन दखल पाचोर्‍यात कायद्याचा व खाकीचा धाक अबाधित ठेवण्यासाठी तसदी घेतिल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भडगाव गिरणा नदीपात्रातील नगरपालिका बांधकाम प्रकरणी मे. उच्च न्यायालयात याचीका दाखल

0

भडगाव- शहरलगत गिरणा नदी पात्रात भडगाव न.पा. तर्फे पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या बांधकाम प्रकरणी मे. औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपिठात ध्येय न्यूजचे पत्रकार संदीप महाजन & माधव जगताप यांची औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधी तज्ञ अँड. हर्षल प्रकाश रणधिर यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल

भडगाव पोलीसांची अभिनंदनीय कामगिरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील दिड कोटीच्या धाडसी चोरीचा काही तासात लावला तपास आरोपीस मुद्देमालसह अटक

0

भडगाव- तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दि. २२ नोहेबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती बँकेचा कर्मचारी यांनेच गावातील नागरीकांना दिली ही माहिती गावभर पसरताच सर्व स्तरावर धावपळ सुरु झाली चौकशी अंती सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास झाल्याचे कळताच भडगाव पोलिसांनी तातडीने युद्ध पातळीवर आपली सर्व यंत्रणा कार्यान्वीत केली भडगाव पोलीस घटना पोहताच बॅकेत प्रत्यक्ष घटनास्थळी चोरी करताना चोरां कडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता. तसेच बँकेत असलेल्या रोकड रक्कमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा असा संशय प्रथमदर्शनी येत होता. आणि त्याच दिशेने पोलिस तपास सुरु केला भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांचे सहकारी पोलीस पथकाने गुन्हेगारांना पडण्यासाठी हालचाली सुरु केल्या अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे सांगितले व चोरी केलेला मुद्देमाल देखील पोलिसांच्या स्वाधीन केला सदर प्रकरणी यात आरोपी वाढ होण्याची शक्यता पोलीसाकडुन वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथिल श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते.

या प्रकरणात नेमकी किती वजनी व रूपयांचे दागिने चोरण्यात आले होते याची माहिती मिळाली नाही. मात्र प्राप्त माहितीनुसार या तिन्ही संशयितांनी पोलिसांना कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेली पाच किलो सोन्याचे दागिने काढून दिले असून पंचनामा करण्यात येत आहे.

घटना स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डा. प्रविण मुंडे यांनी देखील चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने भेट दिली. डीवायएसपी सचिन गोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गावडे, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक, त्याचे पथक पोलीस लक्ष्मण पाटील, भडगाव सहा. फौजदार कैलास गिते, पोलीस का. विलास पाटील, स्वप्निल चव्हाण, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, चालक राजु पाटील करीत आहेत. या महत्वपूर्ण कामगिरी बद्दल संपूर्ण पोलीस समुहाचे पंचक्रोशित अभिनंदन केले जात आहे

मे.सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आरोपी पाचोरा पोलीस स्टेशनला अटक झाल्या नंतर देखील पाचोरा पोलीसां कडून प्रसार माध्यमांना माहीती दिली नाही

0

पाचोरा- शहरातील दि पाचोरा पिपल्स बॅकेत गैर आर्थिक व्यवहार व अपहार केल्या प्रकरणी पाचोरा पिपल्स बँकेचे सभासद व पत्रकार संदीप महाजन यांनी वेगवेगळे 3 ऑडीट रिपोर्टचा आधार घेत पाचोरा पोलीस स्टेशनला दि. 18/7/2019 रोजी दिलेल्या तक्रारी आधारे भाग 5 120/19 नुसार तात्कालीन चेअरमन अशोक संघवी, सी ई ओ नितीन टिल्लू यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपी अशोक संघवी यांनी मे. जिल्हा सत्र न्यायालय जळगाव, मे. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठ , मे. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्याकडे अटकपुर्व जामीन मिळणेकामी धाव घेतली होती परंतु तात्कालीन आय.ओ. यांचा महत्वपुर्ण चिकीत्सक तपास तसेच 1 नव्हे तर तब्बल 3 ऑडीट रिपोर्टसह इतर काही महत्वपुर्ण कागदपत्रे मे. न्यायालयात सादर केल्याने सदर प्रकरणी एक आरोपी वगळता इतर आरोपींना एकही न्यायालयाने मुख्य आरोपीसह इतरांना अटक पुर्व जामीन दिला नाही
याशिवाय याप्रकरणी आणखी काही आरोपी निष्पन्न झाले परंतु कोरोना लाटेमुळे सदर प्रकरणाचा तपास मंदावला होता तर तोशनेवाल सारखे आणखी काही बरेच दोषी अद्यापही आरोपी झालेले नाही. इतर जे आरोपी आहेत ते अजुनही मोकाट आहेत
काल दि 22 नोव्हे.2021 मुख्य आरोपीने हजर होणे? त्यास नियमा नुसार काही तासातच कोर्टात हजर करणे? इतर फरार आरोपी व तपासा संदर्भात संभ्रम असतांना अटक आरोपीस थेट न्यायालयीन कोठडी मागणी करणे ती मिळणे & जमीन अर्जावर दोन दिवसाने सुनवणी ठेवणे या सर्व बाबी संशयास्पद असुन विशेष बाब म्हणजे चक्क मे.सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आरोपी पाचोरा पोलीस स्टेशनला अटक होतो व मे. न्यायालयात हजर केल्या नंतर देखील मे. कोर्टाचे आदेश व इतर आरोपी अद्याप अटक का? नाही. याची सविस्तर प्रेस नोट पाचोरा पोलीसां कडून प्रसार माध्यमांना दिली जात नाही यासंदर्भात पाचोरा पोलीस प्रशासनाच्या भुमीकेवर संशयाचे वातावरण निर्माण होत आहे म्हणुन सदर प्रकरणाचा तपास ईडी, सी. .बी .आय., आर्थिक गुन्हे शाखा, स्थानीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी अर्जाव्दारे मागणी तक्रारदार संदीप महाजन यांनी संबधित विभागाकडे केले आहे

शिंदी शिवारातील गोठ्यातुन गायी चोरी

0

भडगाव-तालुक्यातील शिंदी येथील शिवारातील गोठ्यात असलेल्या गायी चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबात पशुपालकाच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत कैलास महाजन (रा.शिदि) यांनी पोलीस स्टेशन ला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, (ता.13) रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास गाईंचे दुध काढून घरी गेल्यानंतर सकाळी दुध काढण्यासाठी गोठ्यात आल्यावर गोठ्यातील पाच गाईची चोरी तसेच चाऱ्याच्या शेडचे कुलूप तोडलेले दिसले. तर शेड मध्ये एक बकरी व तिची दोन पिल्ले देखील चोरीस गेले शेजारील देविदास खंडू महाजन व राजेंद्र माणिक महाजन हे देखील गाईचे दुध काढण्यासाठी शेतात आले असता त्याची देखील गाय व म्हशीचे पिल्ले सुध्दा चोरीस गेल्याचे दिसून आले.

सदर घटना स्थळी बघितले असता एक चार चाकी गाडीचे टायरचे निशाण दिसत होते. दुभती जनावरेच चोरीला गेल्याने पशुपालक चांगलेच अडचणीत आले आहे.त्यामुळे चोरट्याचा तत्काळ शोध लावून जनावरे मिळावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्राण अ.ह. वाळू साठया प्रकरणी संबंधितांना निलंबित करून सदरचासाठा शासकीय कामांना देण्यात यावा

0

एरंडोल – तालुक्यातील उत्राण ( अ. ह.) गिरणानदी पात्रा लगत सुमारे 20 ब्रास अवैध वाळूचा थप्पा मारल्याचे महसुल विभागाला आढळून आल्याने सदरच्या अवैध वाळू साठ्याची जप्ती करून महसुल प्रशासनाने दि16 नोव्हे.2021 मंगळवार रोजी सकाळी 11-00 सदरच्या वाळू जप्ती साठ्याचा लिलाव केल्याचे निश्चित केले आहे.


सदरचा अनधिकृत प्रकार कायदेशिर करून प्रथमदर्शनी 20 ब्रास वाळू साठा दिसत असला तरी त्याच्या नावावर 200 ते 2000 ब्रास वाळू गिरणा नदी पात्रातुन केव्हा उचलली जाईल याचा वरीष्ठांना सुगावा देखील लागणार नाही व सध्या अवेध वाळू चोरटयांनी महसुल विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांना व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हा अनधिकृत वाळू साठा अधिकृत लिलाव करून त्या आडोशाला मोठ्या प्रमाणावर वाळू उचलण्याची नामी शक्कल लढविली आहे
तरी संदीप महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी महोदय यांच्यासह वरीष्ठांकडे पाठवलेल्या तक्रारी वजा निवेदनात नमुद केले आहे की सर्व प्रथम हा लिलाव रद् करण्यात यावा महत्वाचे म्हणजे महसुल व पोलीस प्रशासनाने वाळू चोरीला आळा घालण्यासाठी स्थानीक स्थरावर महसुल विभागाचे सर्कल, तलाठी, कोतवाल पोलीस प्रशासनाचे स्थानीक बिट हवालदार, पोलीस पाटील यांच्यासह ग्राम पंचायत स्तरावर समिती निश्चित केली आहे. एवढी कर्तव्यदक्ष टिम असतांना अज्ञात व्यक्ती तब्बात 20 ब्रासची अनधिकृत उचल करून नदी किनारीसाठा करे पर्यत ही संपुर्ण जबाबदारी निश्चित केलेले पथकाने आपल्या कर्तव्यात कसुर करत सदरच्या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले म्हणुनच हा प्रकार घडला आहे म्हणून प्रथमदर्शन त्याचे निलंबन करून कायदेशिर कारवाई करावी आणि मग सदरच्या वाळू साठयाची विल्हेवाट लावावी अशी मागणी महाजन यांनी आपल्या तक्रार अर्जाव्दारे केली आहे.

खान्देशचा सुपुत्र रांगोळी कलावंत शैलेश कुलकर्णी थेट दूरदर्शन सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर

0

पाचोरा – शहरातील कला शिक्षक , चित्रकार , रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरील “बियॉंड द थॉट” या सुप्रसिद्ध कार्यक्रमासाठी रांगोळीकार म्हणून निवड झाली होती. या मध्ये त्यांच्या कलाकृती व त्या कलाकृतीं चा प्रवास सांगितलेला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिनांक २० नोव्हेंबर २०२१ वार शनिवार या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता तसेच रात्री १० वा. व पुनः प्रक्षेपण २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे.

रांगोळी कलावंत तथा प्रसिद्ध चित्रकार शैलेश कुळकर्णी हे खान्देशातून या कार्यक्रमासाठी निवड होणारे ते सर्वप्रथम कलाकार आहेत. शैलेश कुलकर्णी हे सर जे जे कला महाविद्यालय मुंबई येथील माजी विद्यार्थी असून खान्देशातील प्रसिद्ध रांगोळीकार & चित्रकार म्हणून ते पंचक्रोशित सर्वपरिचित आहे. घरापुढील काढली जाणारी रांगोळी एका कलाकाराला राष्ट्रीय पातळपर्यंत घेऊन जाऊ शकते ही महत्वपुर्ण बाब आहे.

शैलेश कळकर्णी यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांनी विविध राज्यांतील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसे प्राप्त केली असून रांगोळी कले बरोबर त्यांनी चित्रकलेमध्ये देखील राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.
त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस ध्येय न्युज परिवाराच्या हार्दीक शुभेच्छा

भारतीय जवान मृत्यु प्रकरणी जळगाव जिंल्हाधिकारी साहेबांनी संभ्रम दुर करावा

0

पाचोरा- तालुक्यातील सावखेडा येथील रहिवासी जयसिंग परदेशी यांचे सुपुत्र मंगलसिंग परदेशी यांचे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे बंदुकीची गोळी लागल्यामुळे त्यांचे निधन झाले
यासंदर्भात विविध वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरचे भारतीय जवान मंगल सिंग जयसिंग परदेशी हे नक्षलवाद्यांशी लढताना बंदुकीची गोळी लागल्यामुळे शहीद झाले अशा स्वरूपाचे वृत्त प्रसारित झाले आहे विशेष महत्त्वपूर्ण बाब
म्हणजे यासंदर्भात विविध वृत्तपत्र व सोशल महत्वपुर्ण प्रिंट मीडियाने देखील अशाच स्वरूपाचे वृत्त प्रसारित केल्यामुळे भारतीय जवान यांचे निधन नेमके कशामुळे झाले यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांच्या स्तरावरून कोणत्याही स्वरूपाची अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आलेले नाही स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी देखील नक्षलवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्याची स्व.मंगलसिंग यांची श्रद्धांजलीची पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम देखील रद्द केले आहे परंतु पंजाब राज्यातील पठाणकोट हा परिसर नक्षली चळवळीत येत नाही तर तो दहशत वाद्यांच्या ( अतिरेकी ) चळवळीत येतो त्यामुळे नेमके ते शहीद की विरमरण आले हा दुहेरी संभ्रम देखील निर्माण झाला आहे. भारतीय जवान मंगलसिंग परदेशी यांच्या निधना संदर्भात फक्त त्यांच्या परिवाराच्याच नव्हे तर संपूर्ण गाव व पाचोरा तालुक्यासह परिसराच्या संवेदनशील भावना जोडलेल्या आहेत किंबहुना सावखेडा गावातील एक नव्हे तर 75 तरुण आजही भारतीय सीमेवर लढत आहेत या सर्वांच्या भावनांचा विचार करून
आमच्या मातीतील शहीद सैनिकाला शहीद घोषित करताना सरकार का दिरंगाई करते….?
असा आमचा सवाल आहे
भारतीय जवान यांचे निधन नेमके कशामुळे झाले यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या स्तरावरून कोणत्याही स्वरूपाची अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही.भारतीय जवान मृत्यु प्रकरणी जिंल्हाधिकारी साहेबांनी हा संभ्रम त्वरीत दुर करावा
आमच्या तालुक्यातील जवानाला शहीद घोषित करून तालुक्यातील जनतेच्या व देशप्रेमी जनतेच्या भावनांचा आदर करावा.
अशी मागणी करण्याची वेळ आज ध्येय न्युजवर येत आहे.
जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने संबंधित जवाना संदर्भात शासकीय स्तरावर अधिकृत माहिती प्रसारित करावी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना जे काही लाभ मिळतात त्यासाठी तातडीने कार्यवाही करणे कामी सहकार्य मिळणे अपेक्षित आहे

भारतीय जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचे बंदुकीची गोळी लागल्यामुळे निधन

0
  • पाचोरा-तालुक्यातील सावखेडा जि. जळगावचे सुपुत्र, 734 TPT WKSP मध्ये कार्यरत जवान नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचे दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पहाटे 1.40 वाजता पठाणकोट येथे बंदुकीची गोळी लागल्यामुळे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सोमवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पठाणकोट येथून विमानाने दुपारी 4.00 वाजता मुंबई येथे येईल. तेथुन ॲम्बुलसने त्यांचे मुळगाव सावखेडा, तालुका पाचोरा येथे मंगळवार, 16 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 6 वाजे दरम्यान पोहचेल. त्यानंतर त्यांचेवर सकाळी 9:30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशी माहिती जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे यांनी दूरध्वनीवरून दिली आहेत.
  • 2005 मध्ये मंगल सिंग जयसिंग परदेशी वय 35 हे अलिबाग येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते तद्नंतर त्यांनी सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले तर 2014 मध्ये त्यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील मुंडाळा येथे झाला होता त्यांच्या पश्चात आई – वडील दोन भाऊ, पत्नी दोन मुली व एक मुलगा आहे. भारतीय जवान मंगल सिंग हे दसऱ्याच्या सुट्टी मध्ये एक महिन्यासाठी सुट्टीवर आले होते 30 ऑक्टोबर समाप्त झाल्यानंतरपुनश्च ते पठाणकोट येथे सेवेत हजर झाले डिसेंबर अखेर पंचक्रोशीत प्रसिद्ध अशी सावखेडा येथील भैरवनाथ महाराजांची यात्रा असल्यामुळे ते सुट्टीवर येणार असल्याचे सांगून गेले होते परंतु
  • मंगलसिंग परदेशी यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांसह पाचोरा तालुका व पंचक्रोशीत मोठी शोककळा पसरली
  • भारतीय जवान मंगलसिंग यांच्या निवासस्थानी दु:खी कुटुंबीयांचे सांत्वनसाठी पंचक्रोशीतील सर्व शासकीय राजकीय मान्यवरांनी भेट दिली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!