20 फेब्रू. रोजी पाचोरा येथे श्रीराम क्रिटिकल केअर सेंटरचा शुभारंभ: आधुनिक आरोग्य सेवांचा नवा अध्याय

0

पाचोरा- पाचोरा शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स आणि तातडीच्या सेवांसाठी सज्ज असलेले श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर आता पाचोरा शहरात सुरू होत आहे. या आरोग्य सेवांच्या नव्या पर्वाचा शुभारंभ गुरुवार, 20 फेब्रुवारी 2025 रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड येथे भरगच्च उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे
आरोग्य सेवा ही कोणत्याही समाजाची खरी ताकद असते. वेळेवर मिळणारे उपचार आणि तंत्रज्ञानाने सक्षम असलेली रुग्णसेवा ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर हे पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांसाठी एक वरदान ठरणार आहे. तातडीच्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये वेळीच उपचार मिळावेत, हेच या सेंटरचे मुख्य ध्येय आहे. अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्री, सतत सेवा देणारा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि अनुभवी डॉक्टर्स हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या क्रिटिकल केअर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यात आमदार किशोरआप्पा पाटील, ज्यांनी नेहमीच पाचोरा शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे, त्यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पाचोरा शहरातील शैक्षणिक व कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वैशालीताई सुर्यवंशी यांचीही यावेळी उपस्थिती लाभणार आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक , कृषी ,आणि शैक्षणिक उपक्रम राबवले गेले आहेत, त्यांनी या नव्या सेंटरच्या शुभारंभाला उपस्थीती देऊन शुभेच्छा लाभणार आहे तसेच भाजप चे तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे याची विशेष उपस्थीती असणार आहे
श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर हे पाचोरा शहरात तातडीच्या आरोग्य सेवांसाठी एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे. अपघात, हृदयविकाराचे झटके, ब्रेन स्ट्रोक, अंगावरून वीज पडणे किंवा इतर कोणत्याही तातडीच्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये या सेंटरची सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सेंटरमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. त्यामुळे कुठल्याही वेळेला रुग्णांना उपचार मिळण्याची हमी राहणार आहे.
या सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्वरित निदानासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्स-रे यांसारखी साधने उपलब्ध आहेत. तसेच आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) विभाग आधुनिक पद्धतीने सुसज्ज असून, गंभीर रुग्णांसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा येथे आहेत. डायलिसिस युनिट, व्हेंटिलेटर, हृदयाची तपासणी करणारी उपकरणे आणि आधुनिक औषधांचा साठा हे या सेंटरची खास वैशिष्ट्ये आहेत. यामुळे रुग्णांना पुणे, मुंबई किंवा औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
या सेंटरच्या उभारणीमध्ये सहा डॉक्टर्सनी पुढाकार घेतला आहे. डॉ. अजयसिंग परदेशी (M.D. Physician), डॉ. विशाल पाटील (M.D. Physician), डॉ. अभिषेक जाधव (B.A.M.S.), डॉ. मयूर बाब्रस (M.B.B.S., MD DNB – Nephrologist Transplant Physician), डॉ. संकेत विसपुते (M.B.B.S., MD Medicine) आणि डॉ. अंजली विसपुते (M.B.B.S., CTCCM) हे सर्वजण वैद्यकीय क्षेत्रात अनुभवी आणि नावाजलेले आहेत. या डॉक्टर्सनी रुग्णसेवेचा वसा घेतला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिटिकल केअर सेंटर यशस्वीपणे चालणार आहे.
श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर केवळ वैद्यकीय सेवा देणारे केंद्र नाही, तर हे समाजसेवेला वाहिलेला एक उपक्रम आहे. रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या सेवांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तातडीच्या परिस्थितीत कोणत्याही अडचणीशिवाय उपचार मिळावेत, यासाठी सेंटरकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्या कमजोर रुग्णांसाठीही विशेष योजना आखण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पाचोरा हे कृषी, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. आता वैद्यकीय सेवांमध्येही पाचोरा शहराला एक नवीन ओळख मिळणार आहे. श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर मुळे शहराचा वैद्यकीय नकाशावर ठसा उमटणार आहे. परिसरातील गावांमधूनही रुग्ण या सेंटरमध्ये उपचारासाठी येऊ शकतील, यामुळे पाचोराचा विकास अधिक वेगाने होणार आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहण्याचा संकल्प डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांनी केला आहे. २४ तास सेवा देणारे हे सेंटर रुग्णांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे
रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर सज्ज आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्यासाठी नागरिकांनी 9552528195
या क्रमांकावर संपर्क साधावा.
असे श्रीराम क्रिटिकल केअर सेंटर, सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड, पाचोरा यांच्या तर्फे कळवले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here