Home Blog
Breaking

उद्या दि.18 सप्टे.रोजी मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी तर्फे महालसीकरण शिबिर

0

पाचोरा त्या वादग्रस्त नविन संकुल प्रकरणी न. पा. प्रशासनाचा निर्णय योग्य अर्जदारांचा अर्ज फेटाळला- मा.जिल्हाधिकारीसाहेब यांचा निर्णय

0

पाचोरा-नगरपालीका तर्फे दि. ४ नोव्हे 2020 रोजी जाहीर लिलाव करण्यात आला होता त्यानंतर सदर प्रकरणी चंद्रकांत येवले व इतर व्यापारी न.पा. प्रशासनाच्या भुमिके विरुद्ध अपिल दाखल केले होते
सदर गाळे प्रकरणी तेव्हा लिलाव होऊन डिपाँझीट देखील घेण्यात आली होती तदनंतर अनेक उलट-सुलट चर्चेमुळे बऱ्यापैकी व्यापार्‍यांनी उर्वरित पैसे जमा केले नाही तर दुसऱ्या बाजुने पाचोरा न.पा.प्रशासनाने जळगाव महापालीकेच्या धर्तीवर 30 वर्षाचा करार होणे & भाडे कमी करणे या तत्वावर राज्यशासनाकडे मंजुरकामी प्रस्ताव पाठवला आहे याच दरम्यान नुकताच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या निर्णया आधारे पाचोरा न.पा. प्रशासनाची भुमीका योग्य असुन अर्जदाराचा अर्ज नामंजुर करण्यात आल्याचा निकाल दि 8 सप्टे रोजी दिला आहे
त्यामुळे न.पा. प्रशासन आता लिलावाच्या शर्ती अटींच्या आधीन राहुन लिलावाव्दारे गाळेधारकांनी घेतलेली उर्वरीत रक्कम न जमा केल्याने त्यांची डिपाँझीट जप्त करून सदरचा लिलाव नविन करते की गाळेधारकांना उर्वरित रक्कम भरणेसाठी काही तासची, दिवसाची की? महिन्याची मुदत देते याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.

कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्यांचा पाचोरा नगरपरिषद करणार गौरव

0

पाचोरा- स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत शासनाने दिलेल्या सुचनांनूसार पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी पाचोरा नगरपालिकेच्या वतीने पर्यावरण स्नेही बाप्पा या पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या अभियानाअंतर्गत शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यात आली असून या तलावांमध्ये घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.


कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे. पाचोरा न.पा.क्षेत्रापासून जवळच असलेल्या बहुळा तलावात दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये मुख्यतः पी.ओ.पी. मृतींचा समावेश असतो. पी.ओ.पी.च्या मुर्त्या विसर्जित केल्याने पाण्यामध्ये केमिकल जाऊन सदरच्या तलावातील पाणी दूषित होते. त्याकारणाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही बाब लक्षात ठेवून पाचोरा नगरपालिकेकडून शहरात तसेच विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी (1) छत्रपती संभाजी महाराज चौकात (2) छत्रपती शिवाजी महाराज चौक, (3) म.गांधी चौक (4) आठवडे बाजार (5) जारगांव चौफुली (6) जळगांव चौफुली (7) बहुळा धरण या ठिकाणी कृत्रिम तलावाची / कुंडाची तसेच श्री.गणेश मुर्ती व निर्माल्य संकलन केंद्रांची देखील व्यवस्था करण्यात आली आहेत.


नागरिकांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरीता जवळच्या परिसरातील कृत्रिम तलावात / कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच निर्माल्य जमा करावे. नगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या श्री.गणेश मुर्ती संकलन केंद्रावर, बहुळा धरण परिसरात तसेच कृत्रिम तलाव परिसरात नागरिकांनी नाहक गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेकडून करण्यात आले आहे.

जागृती गणेश मंडळाने विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला – मुख्याधिकारी रविंद्र लांडे

0

भडगांव -आज मोबाईल च्या जगात सेल्फी मुळे प्रत्येक जण आपल्या पुरते पाहत आहे, पण भडगांव शहरातील जागृत युवकांच्या जागृती मित्र मंडळाने समाजातील तत्कालीन परिस्थितीची जाणीव ठेऊन गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे, असे उदगार भडगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रवींद्र लांडे यांनी गणेशोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.


सामाजिक परिस्थितीचे भान ठेऊन आपण आपला उत्सव साजरे केले पाहिजेत ही जाणीव ठेऊन भडगांव येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जागृती मित्र मंडळाने गणेशोत्सव शासकीय नियमाला अनुसरून साजरा केला. यंदाचे हे मंडळाचे ३८वे वर्ष असून, सद्य स्थितीत करोना मुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, रोजंदारी गेली म्हणून मंडळाने ३८विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शासनातर्फे पुस्तक विद्यार्थ्यांना दिली जातात, पण वह्या विकत घ्याव्या लागतात म्हणून मंडळातर्फे भाजी विक्रेते, शेतमजूर, हातगाडीवाले, ड्रायव्हर इत्याती आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना शालेय साहित्य भडगांव नगरपरिषदेचे मुख्यधिकरी रवींद्र लांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
समाजाचे आपण काही देणे लागतो, समाज आपणास भरभरून देतो पण आपण देखीलसमाजास काहीतरी दिले पाहिजे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त कार्यालय अधीक्षक बापू महाजन, पत्रकार सुनील कासार, प्रा. डॉ. दीपक मराठे, प्रा. सुरेश कोळी, मोठ्या संख्येने पालक व विध्यर्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल परदेशी यांनी तर आभार सुरेश भंडारी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिनेश चौधरी, अजय कोळी, मनोज भांडारकर, तांबतकर इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शिवसेनेच्या महालसीकरण शिबीरास प्रचंड प्रतिसाद

0

पाचोरा -पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रथमतः कोरोना लाटेची चाहुल लागताच आपल्या मतदार संघासह परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोना लाटेविरुद्ध लढण्यासाठी प्राथमीक औषधोपचारासह संपुर्ण यंत्रणा उभी केली.

किंबहुना रोजगार गेलेल्या गरजुंना योग्य ती मदत पोहचवण्याचे काम देखील आपल्या शिवसैनिकांच्या मदतीने केले. शिवसेनेचे 80% समाजकारण व 20% राजकारण या ब्रिद वाक्याला न्याय देण्याचा प्रयत्न देखील केला व करत आहे त्याचा प्रत्यय आज पाचोरा शहरात अनुभवास आला. शिवसेनेच्यावतीने पाचोरा शहरातील विविध सहा विभागात कोरोना प्रतिबंधात्मक महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महालसीकरण शिबीरात आज तब्बल ७८५३ नागरिकांना लसींचा पहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ घेत शहरात लसीकरणाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यातून शिवसेनेने आपल्या समाजाभिमुख कार्याचा ठसा पुन्हा एकदा पाचोरा शहरवासीयांच्या चेहर्‍यावर दिसुन आला. गेली कित्येक महिन्यांपासुन कोरोना लसीसाठी वणवण भटकणार्‍या सर्वसामान्य नागरीकांना जेव्हा आपल्याच परिसरात शिवसेनेच्या या लसीकरण शिबीराव्दारे कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले त्याचा आनंद जनतेच्या चेहर्‍यावर दिसुन येत होता. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी वण- वण भटकावे लागत होते तर काहींना तासंतास थांबावे लागत होते.या सर्व परिस्थितीची दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी संबधीत प्रशासनाला सुचीत करून शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

त्याचाच परिपाक म्हणजे आज शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरातील शिवतीर्थ पटांगणात, ड्रीम सिटी भागातील पालिकेने विकसित केलेल्या ओपन स्पेस मध्ये तसेच एम आय डी सी कॉलनी परिसरात,राजीव गांधी कॉलनी परिसरात, गणपती मंदिर ओपन स्पेस, संघवी कॉलनी परिसरातील सुनील झोपे यांचे घराशेजारील ओपन स्पेस मध्ये तसेच सिंधी कॉलनी भागातील झुलेलाल मंदिर परिसर अशा सहा ठिकाणी महालसीकारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याठिकाणी शिस्तबद्धरित्या कोविड १९ लसीचा 7853 नागरीकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळत होते.


दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन आमदार सुपूत्र सुमीत किशोरआप्पा पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर ,आदित्य बिल्दीकर यांनी शिवसेनेच्या स्थानीक पद्‌धिकार्‍यांना हाताशी धरून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले.

शिवसेनेच्या या उपक्रमाचे महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील ,माजी उपजिल्हा प्रमुख ऍड दिनकर देवरे,पप्पू राजपुत, बापू हटकर ,नगरसेवक राम केसवानी,नगरसेवक शीतल सोमवंशी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

पाचोरा नगरपालीका निवडणुक व्युहरचना सुरु

0

पाचोरा- नगरपालीका निवडणुक सद्यास्थितीचा विचार केला तर साधारणतः नोव्हेबर अखेर डिसेंबर मध्ये होऊ शकतात अर्थात आरक्षण अनुसरून मे.न्यायालय, निवडणुक आयोग, कोरोना तिसरी लाट आदी बाबींचा विचार करून तारीख - महीना- वर्ष पुढे मागे देखील होऊ शकते

परंतु आज शिवसेना- भाजप चे लसीकरण शिबीर राष्ट्रवादी नेते मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांचा वाढता जनसंपर्क अशा राजकीय पक्षाचा विचार केला तर सर्वांचे लक्ष  न.पा. निवडणुकीच्याच युद्ध पातळीवर हालचाली आहेत
तसे पाहीले तर यावेळी मागील प्रमाणे प्रभाग रद् होऊन वार्ड नुसार म्हणजेच सन.2011 प्रमाणे वन बाय वन 28 वार्डाची रचना होऊन तशा निवडणुका होणार आहेत फक्त फरक एवढाच असेल 2011 प्रमाणे वार्डरचना न राहता विद्यमान सत्ताधार्‍यांच्या सोई प्रमाणे कॉलनी, गल्ली बदल राहणार आहे.
त्यामुळे यावेळी शिवसेना (आमदार किशोरआप्पा) राष्ट्रवादी ( माजी आमदार दिलीपभाऊ वाघ) भाजप ( अमोलभाऊ शिंदे) यांची नेहमी प्रमाणे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या 5 वर्षात कोट्यावधीचा झालेला विकास ( अर्थात कोणाचा – कसा व कोणत्या मार्गाने झाला हे सर्वश्रृत आहे ) आधी आता आलेली & येणारी कोट्यावधीची विकास कामे यावर डोळा ठेऊन प्रत्येक राजकीय पक्ष व त्यांचे नेते यांना सत्ता स्थापनेसाठी आपले तन, मन, धन लाऊन प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. कोण किती पैसा वार्ड निहाय खर्च करेल हे आजच्या स्थितीत सांगणे कठीण आहे मागील पाच वर्षातील सर्वस्तराचा विकास पाहीला तर आता तरी असे वाटत नाही 95% मतदार नाते,संबध, उपकार यांचा विचार करून हात जोडून – पाय पडून मतदान करतील त्यामुळे किमान डिपॉझीट वाचवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 50 लाख खिशात ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल हे सुर्य प्रकाशा एवढे स्पष्ट आहे & ऐनवेळी जिंकण्यासाठी कोणत्या वार्डात किती रक्कम लागेल हे त्यावेळचे फुटलेले भाव व तात्कालीन स्थितीच सांगेल.
अर्थात आजही वार्ड आरक्षण निघणे बाकी आहे शिवाय नगराध्यक्ष पदाचे पण आरक्षण बाकी आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुक आयोगाने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ग्राम पंचायत निवडणुक प्रमाणे ग्रा.पं.सदस्य निवडी नंतर संरपंच पदाचे आरक्षण जसे निघाले तसे नगरसेवक निवडणुकी नंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला तर सर्वांचीच फार मोठी पंचाईत होणार आहे असो.
येणारी न.पा. निवडणुकीत दलीत & मुस्लीम मतांची एकजुट ही महत्वपुर्ण व निर्णायक ठरणार आहे अर्थात ही एकजुट झाली तर ? कारण शेवटी राजकारण आहे तसेच येणारी न.पा. निवडणुक पक्षीय चिन्हावर की आघाडी मार्फत होणार हे सुद्धा स्पष्ट नाही. राज्य पातळीवर सत्ताधारी आघाडीचा विचार केला तर पाचोरा येथे शिवसेना- राष्ट्रवादी- आय कॉंग्रेस आघाडी धर्म पाळून जागा वाटप युती करून निवडणुक लढतील असे आज तरी वाटत नाही कारण राष्ट्रवादीकडे आजच्या स्थितीला वाघ परिवारातीलच चार उमेदवार रिंगणात असतील त्यापैकी एक नगराध्यक्ष पदासाठी असेल शिवसेनेचा विचार केला तर आज जरी मुकूंदआण्णा बिल्दीकर यांचे नांव नगराध्यक्ष पदासाठी अग्रेसर असले तरी त्यांना नंतरचे अडीच वर्ष आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव प्रथम प्राधान्य अडीच वर्षासाठी सुमीत किशोर पाटील यांचे नांव ऐनवेळी पुढे आल्या शिवाय राहणार नाही. कारण नंतरचे कोणी पाहीले आणि सुमीत किशोर पाटील यास हीच वेळ & संधी असणार आहे. राजकीय प्लॉटफॉर्मसह राजकीय भविष्य उज्वल करण्याची म्हणुन पुत्रप्रेमा पोटी ही संधी आ.किशोरआप्पा सोडतील असे आज तरी वाटत नाही
भाजपच्या बाबतीत विचार केला तर शिंदे परिवारातील सुद्धा घरातील चार उमेदवार नगरसेवकासाठी रिंगणात असतील त्यामुळे अर्थातच वाघ परिवारा प्रमाणे शिंदे परिवारातील चार उमेदावारा पैकी एक नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असेल
परंतु ध्येय न्युजने मागील महीन्यात ब्रेकींग न्युज प्रसारीत केली होती पाचोरा शहरातील दोन धनाढ्य व्यवसाईक यांची पाचोरा येथील युवा नेत्यासोबत एका आमदारासह जळगाव येथे बैठक & न.पा. निवडणुकीच्या रणधुमाळीवर चर्चा त्या बातमी नुसार विचार केला तर
आगामी विधानसभेचा विचार करून अमोलभाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी घरातील उमेदवार थांबवुन डॉ. भुषणदादा मगर & माजी नगरसेवक प्रदीपबापु शांताराम पाटील अडीच-अडीच वर्ष वाटुन नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी लागेल
परंतु या तिघंही पक्षांना स्वतः चा नगराध्यक्ष करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एका पक्षाचे एकतर्फी बहुमत असेल नाहीतर
इतर ठिकाणची उदा. सोडा फक्त पाचोरा न पा मागील 2006 निवडणुकीचा इतिहास पाहीला तर शिवसेना (आघाडी) ❎ राष्ट्रवादी ( दिलीपभाऊ वाघ) एकमेकांच्या विरोधामुळे राष्ट्रीय कॉग्रेसचे अवघे 3 नगरसेवक असतांना देखील नगरराध्यक्ष पदी विनापैशाने विराजमान होण्याची संधी बापु सोनार यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे आता या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप यांना एकतर्फी नगरसेवकांचे बहुमत आणावेच लागणार आहे अन्यथा शिवसेनेच्या पाठींब्याने दिलीपभाऊ वाघ किंवा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष होण्यापासुन कोणीच थांबवु शकत नाही असे आज तरी स्पष्ट चित्र दिसत आहे
परंतु शेवटी ऐनवेळी काय? होईल सांगता येत नाही राजकारण आहे गेल्या जळगाव लोकसभा निवडणुकीत न.पा.वार्ड निवडणुकीच्या लागणार्‍या पैशापेक्षाही कमी पैसे खर्च करून खा. उन्मेशदादा पाटील ऐतिहासीक विक्रमी मतांनी विजयी झाल्याचा इतिहास आपल्या समोर आपल्याच मतदार संघाचा आहे शिवाय नको वाद-विवाद खर्च पाणी म्हणुन ज्याप्रमाणे मागील काही वार्डात घरचे उमेदवार सोईने विजयी होण्याची सेटींग केली गेली. किंवा विकासात राजकारण & घोडे बाजार नको तशी सेटींग करून थेट 40% 30% 30% & नगराध्यक्ष पदाची संधी आळी- पाळी प्रमाणे देण्याच्या निर्णय झाला तर निवडणुकीची सर्व हवाच फुस्स होऊन फक्त 3-4 लाखाच्या खर्चात उमेदवार नगरसेवकपदी विजयी होऊ शकतील

डॉक्टरांनी स्वतः चे रक्तदान करुन वाचवला मातेसह बाळाचा जीव

0

पाचोरा -तालुक्यातील शहापुरे येथील सौ. स्विटी अविनाश खरे ही गरोदर माता अत्यवस्थ अवस्थेत शहरातील हॉस्पिटल चे दार ठोठावत असतांना रुग्णाची गंभीर अवस्था बघुन जळगावी जाण्याचा सल्ला मिळाला. रुग्णाची अवस्था बिकट होती रक्ताचे प्रमाण ४ टक्के तर प्लेटलेट १७ हजार अशा क्रिटिकल अवस्थेत रुग्णाचे सासरे अर्जुन खरे यांना कुठे जावे हे कळत नव्हते रात्री चे बार वाजले होते यावेळी खरे यांचे शहरातील नातेवाईक अरुण ब्राह्मणे मदतीला धावून आले असता त्यांनी ही बाब नंदु सोमवंशी सह कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना सांगितल्यावर श्री. सोमवंशी यांनी तात्काळ लिलावती हॉस्पिटल चे डॉ. वैभव सुर्यवंशी यांना विंनती करुन रुग्णाचे जीवाचे कमीजास्त झाल्यास आम्हीच जबाबदार राहु आपण तात्काळ उपचार सुरू करा. डॉ. सुर्यवंशी यांना एक प्रकारे आव्हान होते.

रक्ताचे प्रमाण कमी आणि त्यात कमी होणार्‍या प्लेटलेट त्यामुळे तात्काळ जळगाव येथुन दोन प्लेटलेट्स च्या पिशवी तर पेशन्ट चे रक्तगट Ab पॉझिटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मिळणे कठीण झाले होते. अशा अवस्थेत स्विटी खरे ची प्रसुतिची वेळ आली पेशन्ट अॉपरेशन करते वेळी योगायोगाने डॉ. सुर्यवंशी यांचा रक्तगट पेशन्टचा असल्याने स्वतः डॉ. सुर्यवंशी यांनी तात्काळ रक्तदान केले आणि स्विटी खरे सह तिच्या बाळाचा जीव वाचविण्यास यश मिळविले आहे. यावेळी हॉस्पिटल चे डॉ. मनोहर शिंपी, सुनिता पाटील, सोनी पाटील, निलेश ब्राह्मणे यांनी मदत केली. खरे परीवाराने डॉक्टर खरोखर देवरुपी असतात याचा प्रत्यय आला

पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. पाचोरा भडगाव येथील सुमारे 50 पत्रकारांनी या शिबीराचा लाभ घेतला.

येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त तेजोदीप नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी खास पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट चे उपप्रांतपाल राजेश मोर, जेष्ठ सदस्य भरत काका सिनकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटेरियन चंद्रकांत लोढाया, डॉ. गोरख महाजन, डॉ. अमोल जाधव, रो. निलेश कोटेचा, रो. पवन अग्रवाल डॉ.पवनसिंग पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, रो. अतुल शिरसमणे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सचिन चौधरी, रावसाहेब बोरसे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकरा वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर केला. समाजातील पत्रकारांची भूमिका व रोटरी क्लबच्या बातम्यांना मिळणारी प्रसिद्धी या बाबत त्यांनी पत्रकारांचे आभार मानले यावेळी डॉ. गोरख महाजन, पत्रकार शांताराम चौधरी, अनिल बाबा येवले, यांचीही समयोचित भाषणे झालीत.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. सी. एन.चौधरी यांनी समाजातील पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली व पत्रकारांसाठी पहिल्यांदाच आयोजित अशा आगळ्या-वेगळ्या शिबिरा बद्दल डॉ. बाळकृष्ण पाटील आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे ऋण व्यक्त केले.

आयोजकांतर्फे उपस्थित सर्व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारातर्फे पत्रकार प्रा सी. एन. चौधरी यांच्या हस्ते तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. बाळकृष्ण पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

उद्घाटन समारंभ नंतर उपस्थित सर्व पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी ला डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांचे समवेत त्यांचे सहकारी गोपाल पाटील, हर्षल अहिरे, तसेच ऑप्टिशियन संतोष पुर्सनानी व सचिन पुर्सनानी यांचे सहकार्य लाभले. सुमारे 55 पत्रकार बांधव या शिबिराला उपस्थित होते पैकी 50 पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक व शिबिराचे प्रोजेक्ट डायरेक्टर शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

भडगाव येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च

0

भडगाव – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात दंगा का काबू आणि रूट मार्च राबविण्यात आला‌ पोलिसांनी राबवलेल्या या दंगा काबू आणि रूट मार्च उपक्रमात दोन अधिकाऱ्यांसमवेत पोलिस स्टेशनचे 18 पोलीस कर्मचारी ,होमगार्ड 28 सहभागी होते.


रूट मार्च हा मेन रोड, सराफ गल्ली, आझाद चौक, मेढ्या मारोती, मार्ग टोनगाव, समर्पण हॉस्पिटल, बाळद रोड, बस स्थानक, मार्ग पोलिस स्टेशन असा रुट मार्च काढण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद शिंदे, स्वप्नील चव्हाण, नितीन रावते, विलास पाटील आदी उपस्थित होते.

नाला अरुंद प्रकरणी नगरसेवक भुषण वाघ यांच्या तक्रारीची दखल तर सदरप्रकरणी अनिल महाजन यांची देखील घेतली उडी

0

पाचोरा- शहरातील भुयारी पूल लगत असलेल्या सिटी सर्वे क्र 3321 ते 3336 च्या जागेवर भव्य व्यापारी संकुलचे काम सुरु आहे परंतु या सर्वे क्रमांकाच्या लगत ब्रिटिशकालीन नैसर्गिक नाला आहे.

परंतु या नैसर्गिक रित्या नाल्या लगत जे व्यापारी संकूल उभारले जात आहे त्या व्यापारी संकूल धारकांनी मंजुर असलेला शासकीय नियम अटी नुसार सदरचे व्यापारी संकूल उभारले जात देखील नाही परंतु त्यांच्या व्यापारी संकुलच्या स्वतःच्या मालकीच्या जागे शिवाय ब्रिटीश कालीन नैसार्गिक रित्या असलेल्या नाल्यात बदल करून

नैसर्गीक 18 फुटी नाल्यावर चारफुटाचा RCC ह्युम पाईप टाकून उर्वरित जागा बेकायदेशिर ताब्यात घेऊन त्याठिकाणी सुद्धा बांधकाम करीत असल्याची तक्रार दि 27 जुलै 2021 रोजी नगरसेवक भुषण दिलीप वाघ यांनी संपुर्ण VDO चित्रीकरण व फोटोसह मा.जिल्हाधिकारी साहेब याच्याकडे दिली होती

त्याची दखल सहाय्यक आयुक्त मा.श्री. सतिश दिघे यांनी घेऊन दि. 8 सप्टेबर 2021 रोजी पाचोरा न.पा.मा. मुख्याधिकारी यांना पत्र पाठवुन आवश्यकती कार्यवाही करून सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा.जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणे बाबत सुचीत केले आहे. तद्नंतर मा. मुख्याधिकारी पाचोरा यांचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही निर्देशित केले आहे.


याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे खडसे समर्थक तथा कृ.उ. बाजार समितीचे प्रशासक अनिल बा. महाजन यांनी देखील सदरची तक्रार 10 सप्टेबर रोजी पाचोरा न.पा.मुख्याधिकारी यांना दिली आहे. सदर प्रकरणी ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी देखील योग्य ती कागदपत्रे संकलीत करुन योग्य त्या ठिकाणी तक्रारी प्रसंगी मे. न्यायालयात देखील जाणार आहेत कारण हा ब्रीटीश कालीन नाला फक्त भुयारी मार्गालगत मर्यादीत समस्येचा नसुन जर हा नाला अरुंद झाला तर त्याचे परीणाम नुकताच चाळीसगाव परिसरात ढगफुटी झाल्यानंतर त्या पावसाचे पाणी शहरात घुसून जशी घरे व संसार उध्वस्त झाली तशी परिस्थिती गणेश कॉलनी, थेपडे नगर, गिरड रोड, आशिर्वाद ड्रीमसिटी,आशिर्वाद कॉटेज तसेच पुनगावरोड लगत दोघंही बाजुंना ज्या कॉलन्या -वत्या आहेत त्यांना त्याची झळ पोहचु शकते परिणाम भोगावा लागु शकतो.


म्हणुन याप्रकरणी अधिकृत माहीती व सत्यता जाणुन घेण्यासाठी न.पा. प्रशासनाशी संपर्क साधला असता अधिकृत सत्य माहीती उपलब्ध होऊ शकली नाही शिवाय याप्रकरणी सदरच्या नाल्यालगत जे व्यापारी संकुल उभारले जात आहे त्यांचा त्याच्याशी संबध आहे त्या प्रमुख व्यक्तीनी ध्येय न्युज कॅमेऱ्या समोर येऊन पुराव्यासह आपले योग्य ते म्हणणे मांडावे यासाठी ध्येय न्युज व्यापारी संकल उभारणी करणाऱ्यांना सुद्धा आमंत्रीत करीत आहे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!