![]()
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी विभागामार्फत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी भूषविले. मराठी भाषेचा गौरव कुसुमाग्रज यांनी वाढविला म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा -दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रा डॉ रेखा पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ .महेंद्र किसन सोनवणे यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मातृभाषा दिन, मातृभाषा दिन हे वेगवेगळे असून मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो असे सांगितले.आपल्या व्याख्यानातून त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती दिली.
सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर उपक्रमाचा आस्वाद बहुसंख्य प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




